`जुलाबरावांच्या` बुडाला कधीही आग लाऊ!

संजय राऊत म्हणाले गद्दारांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकविला
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) अंगार आहे, अंगार पेटत नाही. पण पेटलाच तर विझतही नाही. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या सगळ्या जुलाबरावांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र (Maharashtra) केवळ आदेशाची वाट पाहत आहे, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. (Shivsena rebel MLA should face people not elections)

Sanjay Raut
छगन भुजबळांना जुन्या घराची (शिवसेना) ओढ लागली का?

शिवसेनेतील बंडानंतरचा नाशिकला शक्तिप्रदर्शन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मेळ्यावस उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अल्ताफ खान, भाऊ तांबडे, महागरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदींसह विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Raut
बंडखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

या मेळाव्यात बंडखोरांच्या नावाने घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी लाखोली वाहिली. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाच्या अंगाने मेळाव्याला गर्दी जमवत बंडखोरांना इशारा देण्यात जिल्हा व शहर शिवसेना यशस्वी झाली.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, मुंबईत शिवसेना आहे, तोपर्यंत दिल्लीला महाराष्ट्रापासून कुणालाही तोडता येणार नाही. भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे. मुंबई वाचविण्यासाठी महाराष्ट्राने १०५ हुतात्मे दिले; पण महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही. हा इतिहास आहे. आता ज्यांनी शिवसेना तोडली, त्या दिल्लीश्वरांना मुजरा करण्यासाठी बंडखोर गेले.

शिवसेना आमच्याच बापाची

नाशिकची शिवसेना जागेवरच आहे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य जागेवरच आहे. मालेगाव-नांदगाववाल्यांसह जुलाबरावांनी पाहून घ्यावे, अशी सुरवात करीत श्री. राऊत म्हणाले, की ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही, १०० आमदार, २५ खासदार निवडून आणायची क्षमता आमच्यात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. शिवसेनेशी गद्दारी सोपी नाही, शिवसेना ज्यांनी जन्माला घातली ते शिवसेनाप्रमुख आमचा बाप आहे. ही लढाई फक्त असली-नकली शिवसेनेची नसून ‘सच्चाई विरुद्ध बेइमानी’ यांच्यातील आहे.

ते पुढे म्हणाले, शिवसेना सोडल्याची प्रत्येक जण वेगवेगळी कारण देत आहे. हिंमत असेल तर उघडपणे सांगा, की आम्ही शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र कोरोनाने आजारी असताना खोकेबाजांनी घात केला. साधा आमदार होण्याची लायकी नसलेल्या अनेकांना ‘शिवसेना’ या नावामुळे मानसन्मान प्रतिष्ठा मिळाली. हजारो शिवसैनिकांनी घाम गाळून ज्यांना मंत्री केले, ते खोकेबाजीसाठी गद्दार झाले.

शिवसेनेतून का फुटले, याचे प्रत्येक जण वेगवेगळी कारणे सांगत आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यामुळे जळगावात शिवसेना वाढू शकली नसल्याचा आरोप केला. आधी एकत्र बसा, का फुटलो याचे एक कारण तर ठरवा, असे टोला लगावत फुटून गेलेल्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावेच, असे आव्हान त्यांनी दिले.

शक्तिप्रदर्शनाच्या अंगाने आजच्या शिवसेना मेळाव्याला निवृत्त प्रेस कामगार जयंत गाडेकर, काका पवार आदी जुन्या पिढीतील ज्येष्ठांपासून नाशिक रोड विभागप्रमुख नितीन चिडे, योगेश देशमुख, किरण डहाळे, स्वप्नील औटे, योगेश गाडेकर, वैभव ठाकरे, विक्रांत थोरात आदींपासून तर नवोदित कार्यकर्त्यांपर्यत महिलांची गर्दी मोठी होती.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in