शिवसेना कार्यकर्ते भाजप विरोधात पेटून उठतील!

ईडीने खासदार राऊत यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ दिंडोरी येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
Shivsena Agitation
Shivsena AgitationSarkarnama

लखमापूर : केंद्रातील (Centre Government) कुटील कारस्थानी व मराठी (Marathi) माणसाचे द्वेष्टे भाजप (BJP) सरकार व त्यांच्या नेत्यांनी शिवसेनेला (Shivsena) संपवण्याचा विडा उचलला आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांनी शिवसेना कार्यकर्ते अधिक त्वेषाने काम करतील. पेटून उठलेले शिवसैनिक भाजपला धडा शिकवतील, असा इशारा शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख जयंत दिंडे (Jayant Dinde) यांनी दिला. (BJP had plan to work against Marathi Community)

Shivsena Agitation
Malegaon News: भाजपने राज्यपालांची हाकालपट्टी न केल्यास महागात पडेल

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ दिंडोरीत शिवसेनेतर्फे केंद्र सरकारविरोधात शिवसेना कार्यालयापासून मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Shivsena Agitation
Har ghar Tiranga: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख घरांवर फडकणार तिरंगा

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला.

ईडीमार्फत शिवसैनिकांचा आवाज बंद करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, यातून शिवसैनिक आणखी पेटून उठतील. केंद्र सरकार व ईडीविरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने राजकीय द्वेशातून ही कारवाई केल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध’, असो अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केलेल्या मराठी माणसाच्या अपमानाचाही शिवसैनिकांतर्फे निषेध नोंदविला. नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक पीएसआय कांबळे, एएस आय लहारे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हा प्रमुख नाना मोरे, कैलास पाटील, विलास निरगुडे, प्रवीण जाधव, अस्मिता जोंधळे, नारायण राजगुरु, सुनील मातेरे, संतोष मुरकुटे, विश्वास गोजरे, नदीम सय्यद, संगम देशमुख, पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in