Dhule News: रुग्णांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने हाती घेतला झाडू!

धुळे येथील ‘हिरे’ जिल्हा रुग्णालयात शिवसेनेकडून स्वखर्चाने स्वच्छता करीत टनभर कचरा संकलन.
Shivsena workers in hire hospital.
Shivsena workers in hire hospital.Sarkarnama

धुळे : शहरातील (Dhule) हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी (Government Hospital) संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयाची दुर्दशा झाल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला. आता रुग्णालयाची स्वच्छता मोहीम शिवसेना हाती घेणार आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ५० शिवसैनिक प्रत्येक आठवड्यात रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता मोहीम (Cleanliness Drive) राबविणार आहेत. (Shivsena take initiative for hospital`s clean & Health)

Shivsena workers in hire hospital.
Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

या पार्श्वभूमीवर बुधवारी रुग्णालयाबाहेर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील काटेरी झाडे-झुडपे, बाभळी जेसीबीच्या सहाय्याने हटवली. यात सुमारे टनभर कचऱ्याचे संकलन झाले. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छेतच्या प्रश्नाबाबत गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी जागृत झाले आहेत. अस्वच्छतेमुळे रुग्णांना बरे वाटण्याऐवजी नरकयातना भोगाव्या लागतात. पाचशे खाटांच्या या रुग्णालयाला दरवर्षी मुबलक अनुदानित निधी येतो.

Shivsena workers in hire hospital.
Jalgaon News: अजित पवार आज गिरीश महाजनांची खरडपट्टी काढणार?

दोन- अडीचशे एकरवरील रुग्णालयाच्या आवारात काटेरी वृक्ष, गवत, झाडे, झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीमधील शौचालयांना गळती लागली आहे. ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली आहे. रुग्णालयात सफाई कामगारांची संख्या कमी आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही नवीन भरती झालेली नाही. ठराविकच स्वच्छता कर्मचारी काम करतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. फिनाईल, अ‍ॅसिड, ब्लिचिंग पावडर, बीएससी पावडरचा पुरवठाच होत नसल्याने काम करणारे स्वच्छता कर्मचारी हतबल आहेत. रुग्णालयाबाहेरील रस्ते उखडले आहेत.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, राजेश पटवारी, देविदास लोणारी, ललित माळी, नितीन शिरसाट, गुलाब माळी, भरत मोरे, भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, प्रफुल्ल पाटील, हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, संदीप सूर्यवंशी आदींनी पुढाकार घेऊन स्वच्छतेचा उपक्रम केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in