Shivsena: शिवसेनेच्या घोषणाबाजीने उदय सामंत गोंधळले!

धुळे येथील कार्यक्रमात मंत्री उद्‍य सामंत यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Shivsena agitaion at Dhule
Shivsena agitaion at DhuleSarkarnama

धुळे : राज्यातील (Maharashtra) सत्तासंघर्षानंतर शिवसेना (Shivsena) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यातील संघर्षाचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळत आहेत. धुळ्यातही (Dhule) शनिवारी शिंदे गटातील आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दौऱ्यानिमित्त हे पडसाद उमटले. मंत्री श्री. सामंत यांच्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे जोरदार घोषणाबाजी केली. (Shivsena workers aggressive against Shivsena rebel Uday Samant)

Shivsena agitaion at Dhule
MVP Election: महाराज असते, तर विरोधकांचा कडेलोट केला असता

घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Shivsena agitaion at Dhule
Uday Samant: आता पन्नास आहोत, नंतर शंभर होऊ!

उद्योगमंत्री श्री. सामंत शनिवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पिंपळनेर येथील कार्यक्रम आटोपून धुळ्यात दुपारी साडेतीनला जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक व चारला पत्रकार परिषद होती. या नियोजित कार्यक्रमाला उशीर झाला. दरम्यान, श्री. सामंत यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेचे येथील पदाधिकारी-कार्यकर्ते श्री. सामंत यांच्याविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत होते. त्यामुळे पोलिस यंत्रणाही सतर्क होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅरिकेड्स लावून बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, श्री. सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचण्यापूर्वीच शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते काळे कपडे परिधान करून घोषणाबाजी करत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना शिवसेना कार्यालयाजवळच रोखून ताब्यात घेतले.

‘५० खोके’च्या घोषणा

पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मंत्री श्री. सामंत यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. ‘पन्नास खोके-एकदम ओके’, ‘गद्दारांचा धिक्कार असो’, ‘पन्नास खोके- माजलेत बोके’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेनेचे सहसंपर्क नेते बबन थोरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या उदय सामंतांचा धिक्कार असो, अशाही घोषणा या वेळी देण्यात आल्या. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक दत्तात्रय उजे आदींनी शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांना पोलिस गाडीतून ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, प्रवीण साळवे, कैलास मराठे, नाना वाघ, भरत मोरे, कैलास पाटील, सुनील पाटील, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, कुणाल कानकाटे, शुभम मतकर, छोटू माळी, पवन शिंदे, संजय जवराज,आबा भडागे, सागर निकम, कपिल लिंगायत आदींचा सहभाग होता. श्री. सामंत धुळ्यातून रवाना झाल्यानंतर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in