दोन आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद

धुळ्याचे शिवसेना नेते भगवान करनकाळ यांनी दिला उद्धव ठाकरेंना शब्द.
Uddhav Thakrey with Dhule Shivsena leaders.
Uddhav Thakrey with Dhule Shivsena leaders.Sarkarnama

धुळे : जिल्ह्यात (Dhule) दोन आमदार निवडून आणण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये (Shivsena) आहे. येते २०२४ वर्ष समोर ठेऊन सर्व निष्ठावंतांना सोबत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक ही ताकद सिद्ध करुन दाखवतील, असा विश्वास माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक भगवान करनकाळ (Bhagwan Karankal) यांनी व्यक्त केला. (Dhule city Shivsena is with Party chief Uddhav Thakrey)

Uddhav Thakrey with Dhule Shivsena leaders.
नवा आदेश, नवीन पालकमंत्री येईपर्यंत कामे थांबवा!

श्री. करनकाळ यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाद्वारे सांगितले, की पडझडीच्या काळात जिल्हा शिवसेना नव्या जोमाने, नव्या ताकदीने उभी करण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा संघटक म्हणून जी जबाबदारी दिली आहे, ते धनुष्यबाण उचलण्यासाठी ताकद दिली म्हणून श्री. ठाकरे यांचे आभार मानत आहे.

Uddhav Thakrey with Dhule Shivsena leaders.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपला हवाय बूस्टर डोस!

यावेळी ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे २००३ मध्ये मी धुळे महापालिकेचा शिवसेनेचा प्रथम महापौर झालो. त्याआधी सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो, नगराध्यक्ष झालो. ही सारी किमया शिवसेनेच्या परिस्पर्शामुळे झाली.

श्री. करणकाळ म्हणाले, शिवसेनेने ज्यांना मोठे केले, पद प्रतिष्ठा, पैसा नाव मिळवून दिले. त्यांनी पक्षप्रमुखांची बेईमानी केली. अशा स्थितीत आजही लाखो निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत व कायम राहतील. पक्षप्रमुखांच्या भेटीप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com