आमदार सुहास कांदेंच्या मतदारसंघात संजय राऊत सुटकेनंतर फटाके फोडून आनंदोत्सव

मनमाड शहरात फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
Shivsena workers celebration at Manmad
Shivsena workers celebration at ManmadSarkarnama

मनमाड : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी (Patra chawl case) ५ महिन्यांपासून जेलमध्ये असलेले शिवसेनेचे नेते (Shivsena leader) खासदार संजय राऊत (Sanjay Raut grant bail) यांना अखेर जामीन मंजूर झाल्याने येथे फटाके वाजवून पेढे (distribute sweets) एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव (Gala Function) साजरा करण्यात आला. या वेळी राऊत यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. बंडखोर (Rebel MLA) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांत उत्साह वाढला. (Shivsena workers celebrates after Sanjay Raut grant bail by court)

Shivsena workers celebration at Manmad
आदेशाला स्थगिती आली, त्यानंतर राष्ट्रवादी जागी झाली!

न्यायालयाने खासदार राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत हे आजच जेलबाहेर येणार असल्याने शिवसैनिकांचा आनंद शिगेला पोहचला होता.

Shivsena workers celebration at Manmad
मालेगाव मनपाच्या पायरीवर बोकड बळी

खासदार संजय राऊत यांनी यापुर्वी नांदगाव मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. आमदार सुहास कांदे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात निधीच्या वितरणावरून वाद झाल्यावर खासदार राऊत यांनी या मतदारसंघाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी आमदार कांदे यांचे मनोबल वाढवले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार कांदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे खासदार राऊत यांच्या सुटकेचे या मतदारसंघावर राजकीय परिणाम होऊ शकतात.

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच मनमाडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी एकत्र जमा होत येथील एकात्मता चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली. या वेळी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, सुनील पाटील, संतोष जगताप, पंडित सानप, सनी फसाटे, समाजसेवक विलास कटारे, काँग्रेसचे नाजीम शेख, भीमराव जेजुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in