आमदार मंजुळा गावित परत या, घरात या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ साक्रीत भक्तीयात्रा
Manjula Gavit With Shivsena rebel MLAs
Manjula Gavit With Shivsena rebel MLAsSarkarnama

साक्री : शिवसेनेत (Shivsena) निर्माण झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज शहरासह (Dhule) तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिकांनी भक्तीयात्रा काढत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांचे समर्थन केले. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांना देखील परतण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले. (Shivsena Workers arrange morcha and appeal rebel MLA)

Manjula Gavit With Shivsena rebel MLAs
विमानानं गेलेले बंडखोर जलमार्गानं महाराष्ट्रात परततील का?

शिवसेनेत ठाकरे गट आणि बंडखोर शिंदे गट, अशी उभी फूट पडली आहे. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे पोचले आहेत. यात त्यांच्यासह तालुक्याच्या अपक्ष व शिवसेनेच्या सोबत असणाऱ्या आमदार मंजुळा गावित, त्यांचे पती जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे देखील गुवाहाटीत पोचलेले असल्याने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण दिसून येत होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत बंडखोर आमदारांना इशारा दिल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मात्र आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Manjula Gavit With Shivsena rebel MLAs
विमानानं गेलेले बंडखोर जलमार्गानं महाराष्ट्रात परततील का?

या अनुषंगानेच शनिवारी शहरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भक्तीयात्रा काढून सर्व शिवसैनिकांनी एक प्रकारे आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे अधोरेखित केले आहे. हे करत असतानाच मात्र बंडखोरी केलेल्या आमदारांनी देखील पुन्हा परत येण्याचे आवाहन केले.

यावेळी मोर्चात सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख भूपेश शहा, किशोर वाघ, तालुकाप्रमुख पंकज मराठे, पिंपळनेर तालुका प्रमुख हिंमत साबळे, नगरसेवक सुमीत नागरे, राहुल भोसले, बाळा शिंदे, पंचायत समिती सदस्य महावीर जैन, राजधर देसले, बाळूशेठ टाटिया, संघटक अमोल सोनवणे, संजय वाल्हे, युवती सेनेच्या कामिनी देसले, अशोक गिरी आधीच शहरासह तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com