बंडखोर सुहास कांदेना टोलनाक्यावरच शिवसेनेने अडवले!

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर सुहास कांदे यांच्या विरोधासाठी शिवसेनेची गर्दी
Aditya Thakre & Suhas Kande
Aditya Thakre & Suhas KandeSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) यांना निवेदन देण्याची परवानगी मागणाऱ्या बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा पहिला संघर्ष पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर झाला. आमदार कांदे यांच्या वाहनांचा ताफा आज दुपारी बाराला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. त्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. (Shivsena workers Shout slowguns against Rebel Suhas Kande)

Aditya Thakre & Suhas Kande
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

शिवसेना कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी आज नाशिककहून मनमाडकडे प्रयान केले आहे. मात्र त्याआधीच आज सकाळी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आपण कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन माझे काय चुकले याची विचारणा करणार असल्याचे सांगतिले होते. त्यानंतर त्यांनी निवेदन देणार असल्याचे सांगितले. या सर्व गोंधळात मनमाड येथे मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमले होते.

Aditya Thakre & Suhas Kande
खासदार हेमंत गोडसे फुटले, मात्र शिवसैनिक जागचा हलला नाही.

आमदार कांदे नाशिकहून आपल्या नाशिकच्या समर्थकांसह मनमाडला निघाले होते. त्यांच्या समवेत वीस ते बावीस वाहने होते. ही वाहने पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर आले असता तेथे आधीच शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते जमले होते. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी कांदे वाहनातून उतरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी त्यांनी पुन्हा गाडीत बसवले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. कांदे यांच्याबाबत त्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in