बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर!

मनमाड येथे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले.
Suhas Kande News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
Suhas Kande News, Nashik Latest Marathi News, Shivsena NewsSarkarnama

मनमाड : शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात मनमाड शहरातील शिवसैनिक बुधवारी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आजी- माजी शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी एकाच ठिकाणी आंदोलन केले. या वेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Shivsena workers angry on Local MLA`s rebel against party)

Suhas Kande News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
नव्या सरकारमध्ये असणार खानदेशचे ५ मंत्री

विशेष म्हणजे बंड करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नेते गणेश धात्रक यांना पोलिस संरक्षण दिल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते.(Nashik Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाड शहरातील शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आंदोलनात उतरल्याचे दिसले. शिंदे यांच्या या बंडात नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी देखील साथ दिली आहे.(Shivsena News)

Suhas Kande News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
...आता बारी जळगाव महापालिकेतील सत्तांतराची?

आमदारांच्या या भुमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शिवसेना नेते गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास माजी आमदार राजेंद्र देशमुख, शिवसेना नेते अल्ताफ खान, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, प्रवीण नाईक, तालुका संघटक संजय कटारिया आदींच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली.

दरम्यान, मंगळवारी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली. मात्र, वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे स्थानिक पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्याने आज रॅली स्थगित करावी लागली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेनेचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनेक वर्षानंतर शिवसेनेचे खरे रूप आजच्या आंदोलनानिमित्त समोर आले. जुने- नवीन सर्वच शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात ज्येष्ठ शिवसैनिक हरीश असर, रऊफ मिर्झा, गोविंद रसाळ, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, विनय आहेर, लियाकत शेख, किरण शिंदे, महेंद्र शिरसाठ, दिलीप तेजवाणी, कैलास गवळी, सुरेखा मोरे, सुनील गवळी, हर्षल भाबड, अमीन पटेल, दिनेश केकान, संतोष जगताप, कयाम सय्यद, ॲड. सुधाकर मोरे, युवासेनेचे पदाधिकारी स्वराज देशमुख, अमोल दंडगव्हाळ, विक्की सुरवसे, मुक्ता नलावडे, अशोक पदमर, कैलास भाबड, आशिष घुगे, अंकुश गवळी यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गणेश धात्रक यांना पोलिस संरक्षण

मनमाड शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार सुहास कांदे यांनी शिवसेनेशी बंड करून शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिकांच्या भावना अनावर झाल्या. शहरात रॅली काढण्यात येणार असल्याचे समजताच रॅलीमध्ये अनुचित प्रकार घडू शकतो, अशा आशयाचे पत्र शिवसेनेच्या एका तालुका पदाधिकाऱ्याकडून पोलिसांना दिले असल्याची जोरदार चर्चा शहरात होती. रॅलीला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in