Shivsena: शिवसेनेच्या महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध
Shivsena womens agitation
Shivsena womens agitationSarkarnama

नाशिक : महिला डॉक्टरांविषयी (Women Doctor) आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत सोमवारी शहरात शिवसेना (Shivsena) महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले. शालीमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. (Gulabrao Patil`s statement regarding women doctors is unfortunate)

Shivsena womens agitation
MVP Election: ‘मविप्र’मध्ये ‘परिवर्तन’; अॅड नितीन ठाकरेंचे पॅनल विजयी

मंत्र्यापेक्षा डॉक्टर बरे. स्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारे कधीच स्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाहीत, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान केल्याचा आरोप करीत शिवसेना महिला आघाडी, शिवसेना युवती सेनेतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Shivsena womens agitation
Vijaykumar Gavit: नवीन अंगणवाडींचे बांधकाम पूर्ण करा!

पाटील हेच सांगू शकतील

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याविषयी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना विचारले असता, त्यांनी मंत्री पाटील यांना काय आधारावर हे विधान केले सांगता येणार नाही. त्याविषयी श्री. पाटील हेच सागू शकतील, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, युवती सेना उपजिल्हाधिकारी हर्षदा गायकर आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. योगिता गायकवाड, महानगर अधिकारी माधुरी पाटील आदी सहभागी झाल्या. आंदोलनात महिला आघाडीच्या पदाधिकारी शोभा दोंदे, फैमिदा रंगरेज, श्रध्दा कोतवाल, द्वारका गोसावी, अंजुम खान, शोभा वाल्डे, मोती निकम, युवती सेना पदाधिकारी स्वाती देशमुख, माधुरी पाटील, वेदिका नगरे, दीपाली पाटील, रूपा देशमुख, मानसी पाटील, अनुजा चव्हाण, स्वरूपा राऊत, इंद्रायणी पळसकर, कल्याणी लोकरे, प्राची पवार, पूजा वारके आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in