लग्नाळू युवकांना गंडवणाऱ्या जोडप्याला शिवसेनेच्या महिलांचा हिसका!

धुळे येथे लग्नासाठी फसवणूक करणाऱ्या सराईत दाम्पत्यास शिवसेनेच्या महिला आघाडीने दिले पोलिसांच्या ताब्यात.
Arrested couple at Dhule
Arrested couple at DhuleSarkarnama

धुळे : लग्न लावत तरुणांची (Youth) फसवणूक करणाऱ्या जळगाव येथील दाम्पत्याला पीडित कुटुंबासह शिवसेनेच्या (Shivsena) महिला कार्यकर्त्यांनी एक मोहिम राबवून रंगेहाथ पकडले. त्यानंतर या दाम्पत्याला शिवसेनेचा हिसका दाखवत वठणीवर आणले. त्यामुळे फसवणूक झालेल्या युवकांनी शिवसेनेच्या महिलांचे (Womens) आभार व्यक्त केले.

Arrested couple at Dhule
प्रगती हवी, तर विकास करणाऱ्याच्या पाठिशी राहावे लागेल!

आर्वी (ता. धुळे) येथील नवा मारोती चौकातील सचिन रमेश चौधरी या तरुणाचे २ फेब्रुवारीला विद्यानगर (भुसावळ, जि. जळगाव) येथील प्रिया नवल पवार हिच्याशी श्री एकवीरादेवी मंदिरात लग्न झाले. तशी न्यायालयात नोंदणीही करण्यात आली. लग्न जमण्यासाठी जळगावच्या एजंटला दीड लाख रूपये दिले. लग्नानंतर आठ दिवसांत प्रिया पळून गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन चौधरी आणि कुटुंबियांनी शोध सुरु केला; मात्र जळगावचा एजंटही बेपत्ता झाला.

Arrested couple at Dhule
मुख्यमंत्री, शरद पवारांसह सर्व भक्कमपणे नवाब मलिकांच्या पाठिशी!

मालेगावमध्येही फसवणूक

दरम्यान, सागर रमेश पवार (रा. मालेगाव) याचीदेखील अशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. २३ ऑगस्ट २०२० ला जळगावच्या सुनीता नावाच्या तरुणीशी एजंटच्या माध्यमातून त्यांचे लग्न झाले. तीदेखील आठ दिवसांत ३५ ते ४० हजार रूपयांचा ऐवज घेऊन पळून गेली. सागरचा भाऊ योगेश याचा नाशिकच्या बस्ते नावाच्या एजंटशी परिचय होता. त्याने जळगावच्या एजंटचे नाव सुचविले. हमी घेत त्यातून विवाह झाला. फसवणूक झाल्याने योगेशदेखील गेल्या दोन वर्षांपासून एजंटचा शोध घेत हेाता. आर्वीच्या सचिनने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यात एजंटचा फोटोही होता. त्यावरून योगेश हा सचिन चौधरी याच्याकडे पोचला. मात्र, तोपर्यंत त्याचीसुद्धा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दोघांनी शोध सुरु ठेवला.

असा रचला सापळा

सचिन चौधरी यांनी पंचायत समिती सदस्य दिलीप देसले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या हेमा हेमाडे यांच्याशी संपर्क साधत आपबिती सांगितली. त्यावर त्यांनी जळगावच्या एजंटचा मोबाइल नंबर मिळविला. हेमा हेमाडे आणि दिलीप देसले यांनी लग्नासाठी आम्हाला मुलगी मिळवून द्या, अशी गळ एजंटला घातली. सुरवातीला त्यांनी टाळाटाळ केली. पण, नंतर होकार दिला. खासगी वाहनाने हेमाडे, आशा पाटील, प्रतीभा सोनवणे, देसले, सचिन चौधरी आणि योगेश पवार जळगावच्या त्या एजंटच्या घरी गेले. शनिवारी (ता. २६) सकाळी दोघांना ताब्यात घेत येथील तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित संदीप पाटील आणि करुणा पाटील असे त्या एजंट दाम्पत्याचे नाव आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com