शिवसेना नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता खालसा करेल

संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात
Shivsena leader Bhausaheb Choudhary
Shivsena leader Bhausaheb ChoudharySarkarnama

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची बूथ यंत्रणा अत्यंत सक्षम झाली आहे. आमचे बूथप्रमुख कोणतेही आव्हान पेलण्यास सज्ज आहेत. त्यामुळे या वेळी सत्तापरिवर्तन अटळ असून, महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा विश्‍वास जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी व्यक्त केला.

Shivsena leader Bhausaheb Choudhary
नाशिकच्या साहित्य संमेलनात ‘मन की बात’वर ओढले ‘आसूड’

सातपूर भागातील बूथप्रमुखांना श्री. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेने गेले पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळातील गोंधळ, घोटाळे व जनतेला त्रस्त करणाऱ्या विषयावर सातत्याने आवाज उठवला. भाजपला सत्ता देऊन चुक झाल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. या पक्षाने शहराचे विद्रुपीकरण केले. आज कोट्यावधींची उधळपट्टी करून शहरातील प्रत्येक रस्ता खोदण्यात आला आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. जनतेचा हा संताप भाजपच्या लक्षात आल्याने त्यांनी नव्या घोषणा देण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बुथप्रमुखांनी सावध रहावे.

Shivsena leader Bhausaheb Choudhary
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको ही आमची स्पष्ट भूमिका!

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपमहानगरप्रमुख देवा जाधव, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महानगर संघटक योगेश बेलदार, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका सीमा निखळ, हेमलता कांडेकर, गोकुळ निगळ, योगेश गांगुर्डे, करण गायकर आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com