शिवसेनेपुढे अन्य पक्षांचा पालापाचोळा होईल!

शिवसेना उपनेते सुनील बागूल यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Sunil Bagul, Shivsena
Sunil Bagul, ShivsenaSarkarnama

नाशिक : नाशिकरोड हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. आगामी महापालिका (NMC) निवडणुकीत या विभागातून पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत. त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा. शिवसेनेपुढे अन्य पक्षांचा पालापाचोळा होईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांनी केले.

Sunil Bagul, Shivsena
देशातील हुकूमशाही विरुद्ध लढण्यासाठी एक व्हा!

शिवसेनेच्या कार्यालयात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते सुनिल बागूल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते.

Sunil Bagul, Shivsena
भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण करीत कपडे फाडले!

नाशिकरोड विभागातील सर्व प्रभागांतील शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख व अंगीकृत संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी श्री. बागूल बोलत होते.

ते म्हणाले, शिवसेनेने तसेच महाविकास आघाडी सरकारने जनहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. विविध उपक्रमही राबविले आहेत. ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा.

शिवसेना हा सामान्यांचे हित जोपासणारा पक्ष आहे. कोविडकाळात पक्षाने केलेल्या कामाला तर तोडच नाही. लोकांनाही शिवसेनेची महापालिकेवर एकहाती सत्ता यावी असे वाटते. त्यामुळे या संधीचे सोनं करण्यासाठी तन मन धनाने कामाला लागावे. तसे झाल्यास शिवसेनेचा पराभव करण्याची कोणत्याही पक्षाची क्षमता नाही. नाशिकरोडचा परिसर तर अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नागरिकांचा शिवसेनेला पाठींबा आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे अन्य विरोधकांचा पालापाचोळा होईल.

ते पुढे म्हणाले, भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध खोटेनाटे आरोपांची मालीकाच सुरु केली आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता ते कदापी सहन करणार नाही. कोणीही ते खपवून घेऊ नका. त्याला जसाश तशी भाषा वापरा. शिवसेना स्टाईलने या अपप्रचाराला सामोरे जाऊन उत्तर द्या. त्यासाठी सर्व शिवसेना राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

यावेळी उपस्थितांनी नाशिकरोड परिसरातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी व्यक्तीगत चर्चा करुन पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. प्रभागात सदस्य नोदंणी मोहिमेस मिळालेला प्रतिसाद, मतदारयाद्यांचा अभ्यास, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना व प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते, जीथे पराभव झाला त्याची कारणे आदींचा आढावा घेतला.

या बैठकीस माजी महापौर नयना घोलप, देवळाली विधानसभा मतदारसंघ प्रमुख केशव पोरजे, पूर्व विधानसभा मतदारसंघ प्रमुख नितीन चिडे, नगरसेवक सुर्यकांत लवटे, ज्योती खोले, ज्योती देवरे, स्वाती पाटील, प्रज्ञा गायकवाड, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, उपमहानगरप्रमुख योगेश देशमुख, समन्वयक शिवा तकाटे, मसूद जिलानी, भारतीय विद्यार्थी सेनेचे महानगर संघटक श्रीकांत मगर, विभाग प्रमुख स्वप्नील औटे, गणेश गडाख, नितीन खर्जुल, अमित भगत, उपविभाग प्रमुख उमेश शिंदे, योगेश नागरे, विकास ढकोलिया, सग्राम फडके, कुलदिप आढाव, सागर निकाळे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com