तोरणमाळ विकास प्राधिकरणाची लवकरच स्थापना

बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानास सुरवात झाली.
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

शहादा : तोरणमाळ (Nandurbar) पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे (Shivsena) धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी दिली. (Envirnment Minister order to take praposal of Toranmal Tourism)

Aditya Thakre
भाजप नेत्याने पक्षाच्या बैठकीत बंदूक काढली!

सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पालघरचे खासदार राजेंद्र गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, समन्वयक दीपक गवते, अरुण चौधरी, तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार, मधुकर मिस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Aditya Thakre
अजित पवारांच्या दणक्याने भाजपला दादागिरी महागात पडली!

श्री. थोरात म्हणाले, तोरणमाळचा विकास आराखडा तयार असून त्यासाठी तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांना पर्यटनमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच तोरणमाळच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात तोरणमाळ पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची क्षमता

श्री. थोरात म्हणाले, सध्या संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातून मोठ्या जिद्दीने शिवसेना पालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलले असून, शिवसेना मोठ्या ताकदीने तिसरा पर्याय म्हणून उभी राहिली आहे. शिवसेना ताकदीने स्वबळावर लढण्याची देखील क्षमता ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, निवडणुकीत शिवसेनेचा शहरात असलेली भरमसाठ पाणीपट्टी कमी करण्याचा मुख्य मुद्दा राहणार आहे. उपसा सिंचन योजना जिल्हातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून पाणी असूनही त्याचा उपयोग होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. असे त्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com