Shivsena: शिवसेनेचा वीजेच्या प्रश्नावर महावितरणला अल्टिमेटम!

मनमाड शहरात कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीजपुरवठा करण्यासाठी इशारा दिला.
Shivsena leaders At MSEDC Manmad Office
Shivsena leaders At MSEDC Manmad OfficeSarkarnama

मनमाड : मनमाड- (Manmad) लासलगाव- (Lasalgaon) चांदवड (Chandwad) चौफुली येथील प्रवेशद्वाराजवळ रोहित्र बसविणे, निंबाळकर चाळ येथे सातत्याने विज (Electricity supply) खंडीत होत असून, येत्या सात दिवसात प्रश्‍न मार्गी न लागल्यास शिवसेनेतर्फे (Shivsena) तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. (Manmad city facing various electricity supply issues)

Shivsena leaders At MSEDC Manmad Office
Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रू!

मनमाड- लासलगाव- चांदवड चौफुली येथे गुरुद्वारातर्फे भव्य धार्मिक प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. याठिकाणी विधानपरिषद व शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या विकास निधीतून हायमास्ट बसविण्यात आले आहे. मात्र, हायमास्ट सुरु राहण्यासाठी याठिकाणी १५ के. व्ही. क्षमतेचे रोहित्र असणे आवश्यक आहे. हायमास्ट बसवून सुमारे १० ते १२ महिने झाले तरी सुरु झालेला नाही. प्रवेशद्वार परिसर हा सार्वजनिक असल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक समस्यांना नागरीक व वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.

Shivsena leaders At MSEDC Manmad Office
Dada Bhuse: ५० खोक्यांच्या घोषणेने दादा भुसे राजकीयदृष्या अस्वस्थ?

या भागात अपघातदेखील होत आहेत. तत्काळ याठिकाणी रोहित्र बसविण्यात यावा, पालिकेच्या माध्यमातून स्ट्रिट लाईटवरुन हायमास्टला मिटर देण्यासाठी संमती मिळावी, गुरुद्वारासमोर निंबाळकर रोहित्र असून, रोज वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐन गणेशोत्सवात वीज खंडीत होत आहे. सदर बाबींची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही व्हावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, प्रवीण नाईक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, शहरप्रमुख मयूर बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, स्वराज्य देशमुख, प्रवीण धाकराव, योगेश देशपांडे, शैलेश सोनवणे, लियाकत शेख, अनिल दराडे, विजय मिश्रा, माधव शेलार आदी शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in