शिवसेनेने काढली भाजप सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

शिवसेनेने पाचोरा येथे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
Shivsena Agitaion against BJP Government
Shivsena Agitaion against BJP GovernmentSarkarnama

पाचोरा : शिवसेनेतर्फे (Shivsena) महागाईच्या (Inflation)विरोधी केंद्र शासनाची (Centre Government) प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे प्रतिकात्मक अंत्ययात्रेत सहभागी होऊन केंद्र शासनाच्या विरोधात केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे शहर अक्षरशः दणाणले होते. (Shivsena agitate against BJP Government on Onflation)

Shivsena Agitaion against BJP Government
सरपंच लीना पाटील यांनी नदीलाही फोडला पाझर!

शहरातील जामनेर रस्त्यावरील शिवसेना कार्यालयापासून प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरवात झाली. यावेळी लोटगाडी व तिरडीवर गॅस सिलिंडरची हंडी व मोटारसायकल ठेवून डिझेल, पेट्रोल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान, केंद्र शासनाच्या विरोधात केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. तहसील कार्यालयात प्रतिकात्मक अंत्ययात्रा नेऊन आमदार किशोर पाटील यांनी नायब तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन दिले.

Shivsena Agitaion against BJP Government
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

आंदोलनात सहभागी पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महागाई संदर्भात त्वरित निर्णय घेऊन केंद्र सरकारने वाढती महागाई कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विसावा देत काढलेल्या अंत्ययात्रेची चर्चा

शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत वाद्य वाजवण्यात आले. अग्रभागी वैभव राजपूत यांनी मडके धरले, त्यांना रवींद्र पाटील व सुमित पाटील यांनी आधार दिला. शिवसेना कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी चौक, शिवाजी महाराज पुतळा, ई- वाचनालय, सार्वजनिक पाणपोईमार्गे तहसील कार्यालयात अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्ययात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे विसावा देखील देण्यात आला. यावेळी काही शिवसैनिकांनी रडवेल्या सुरात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला. शिवसेनेने काढलेल्या या अनोख्या अंत्ययात्रेची जोरदार चर्चा शहरात सुरु होती.

यावेळी सुमित पाटील, ॲड. अभय पाटील, शरद पाटील, किशोर बारवकर, जितेंद्र जैन, मुकुंद बिल्दीकर, बंडू चौधरी, डॉ. भरत पाटील, चंद्रकांत धनवडे, शरद पाटे, संजय जडे, संदीपराजे पाटील, जितेंद्र पेंढारकर, पदमसिंग राजपूत, अनिल सावंत, महेश सोमवंशी, सतीश चेडे, अय्युब बागवान, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com