भाजपला जागे करण्यासाठी शिवसेनेचे हनुमानचालिसा पठण!

धुळे शहरातील पाणीप्रश्‍नी सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केले.
भाजपला जागे करण्यासाठी शिवसेनेचे हनुमानचालिसा पठण!
Shivsena workers praying with Hanuman ChalisaSarkarnama

धुळे : देवपूर (Dhule) भागातील जनतेच्या पाणीप्रश्‍नी महापालिकेतील (Dhule corporation) सत्ताधारी व प्रशासनाला जागे करण्यासाठी देवपूर शिवसेनेतर्फे (Shivsena) हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक पठणाचा कार्यक्रम झाला. महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, नागरिकांना शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चा काढू, असा इशाराही शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ललित माळी (Lalit Mali) यांनी दिला.

Shivsena workers praying with Hanuman Chalisa
गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

उन्हाळ्यात देवपूरवासीयांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. १५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट व नियमबाह्य पद्धतीने काम झाले आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वीच गटार व नालीचे पाणी रस्त्यांवर येत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

Shivsena workers praying with Hanuman Chalisa
गडकरी येता घरी...महापालिका एका रात्रीत १६ लाखांचा रस्ता करी!

मात्र, सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकारी व काही नगरसेवक संबंधित विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व कटकारस्थानातून देवपूरवासीयांना पाण्यासाठी तरसवले जात आहे. १५४ कोटींच्या योजनेंतर्गत नगावबारी जलकुंभ वेळीच उपयोगात न आणल्याने निरूपयोगी अवस्थेत येऊन ठेपले आहेत.

सत्ताधारी नगरसेवक मात्र पदे मिरवण्यात, धर्माच्या नावाने गलिच्छ राजकारणात दंग आहेत. जनतेच्या समस्यांविषयी अनभिज्ञ असलेल्या, सत्तेच्या मस्तीत गैरव्यवहारांत लाखो रुपये कमविण्याच्या धुंदीत असलेल्या सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवक व गेंड्याची कातडी असलेले महापालिकेचे काही अधिकाऱ्यांना कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेतल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. आद्य बजरंग ग्रुप व देवपूर शिवसेनेमार्फत भंडाराही झाला.

यावेळी शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख मनोज मोरे, धीरज पाटील, ललित माळी, पिंटू शिरसाठ, चंद्रकांत गुरव, हेमंत माळी, आनंद माळी, ऋषिकेश महाजन, मोहित वाघ, कृष्णा मांडे, रोहित अमृतकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.