Shivsena : शिवसेना संपू नये, ही प्रत्येक मराठी माणसाची भावना!

शिवसेनेचे आपसातील भांडण ते कसं सोडवतात,याची सगळ्यांना उत्सुकता.
Chhagan Bhujbal news, Shivsena News, Nashik News
Chhagan Bhujbal news, Shivsena News, Nashik NewsSarkarnama

नाशिक : मी जवळपास स्थापनेपासून शिवसेनेत (Shivsena) होते. शिवसेना संपता कामा नये, अशीच सर्व शिवसैनिकांची, महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. जे शिवसेनेत आहेत, जे शिवसेनेत नाहीत, त्या सगळ्यांची हीच भावना आहे. हे लक्षात घेऊन अंतर्गत भांडणं मिटवावीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. (Shivsena should remain & in strong is every marathi people`s wish)

Chhagan Bhujbal news, Shivsena News, Nashik News
दादा भुसेंच्या बैठकीत मोबाईल स्वीच ऑफ अन् कडेकोट बंदोबस्त

श्री. भुजबळ राज्यातील अस्थिरता संपल्यानंतर काल नाशिकला दाखल झाले. आज सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी तर शिवसेनेत पहिल्या दिवसापासून होतो असे समजा. त्याच्या आधीचे वा नंतरचे शिवसेनेत लिलाधर डाके आणि सुभाष देसाई हे दोघे त्यावेळेस माझ्यासोबत नेते म्हणून काम करीत होते. माझ्या सारख्याला असं कधी वाटणार नाही की, शिवसेना संपावी. महाराष्ट्रातील कुठल्याही मराठी माणसाला अस वाटणार नाही की, शिवसेना संपावी. त्यांची भांडणं आहेत, ती त्यांनी सोडवावी. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु शिवसेना संपता कामा नये. जे शिवसेनेत आहे, जे शिवसेनेत नाहीत, असचं सगळ्या जनतेच मत आहे.(Nashik Latest Marathi News)

Chhagan Bhujbal news, Shivsena News, Nashik News
Nashik : संजय राऊत करणार नाशिकला शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन!

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आमचे आहे, असा दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता श्री भुजबळ म्हणाले, या लढाईत काय होईल हे मी सांगू शकत नाही. कोणाच्या बाजूने पारडे झुकेल, काय होईल. हे जरी झालं तरी राज्यातील शिवसैनिक कोणाच्या बाजुने आहेत ते पहावे लागेल. त्याचा काय परिणाम पुढे होणार आहे, याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत. (Shivsena News)

ते पुढे म्हणाले, एखाद्या घरात नवीन काही तरी कार्य झालेलं आहे. त्याबाद्दल काही वाईट बोलणं ही आपली संस्कृती नाही. त्यांचा उद्याच लगेच घटस्फोट होईल असे काही मी म्हणणार नाही. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आहोत. सध्याच्या प्राप्त परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाची तलवार लटकलेली आहे. अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही, त्याचं खरं कारण न्यायालयातील खटला आहे.

यामुळे मंत्रीमंडळ विस्तार नाही

अरुणाचल प्रदेशात झालेला नवीब राबीया खटला होता. २०१४ च्या या खटल्यात अशीच स्थिती तिकडे होते. अगदी तसेच एकनाथ शिंदे पक्षातून फुटले तसेच तिकडे फुट झाली होती. कालीका पोल हे पक्षातून फुटले होते. तुकी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. राजकुवर नावाचे राज्यपाल होते. त्यावेळी आज महाराष्ट्रात जे घडले, तसेच घडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने काँग्रेसच्या बाजुने निकाल दिला. फुटलेल्या आमदारांच्या विरोधात तो निकाल गेला. अशा स्थितीत आज काय परिस्थिती आहे. त्याचे अवलोकन आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कशी होते?. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर सगळे अवलंबून आहे.

ते पुढे म्हणाले, राज्यात नवे सरकार आलेले आहे. त्यामुळे सरकार असो वा नसो प्रत्येकाने आपआपल्या मतदारसंघाकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या दहा पंधरा दिवसांत राज्यातील राजकीय घडामोडींमुळे व्यस्त होतो. त्यामुळे आज येवला मतदारसंघात जात आहे. आज मतदारसंघातील नागरिकांशी बोलणार आहे. त्यानंतर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकुळ आहे. नाशिकला अजुनही पुरेसा पाऊस झालेला नाही. १०० मीलीमीटर पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या मात्र शेतकरी पावसाची वाट पाहतो आहे. गंगापूर धरणात २५ ते २८ टक्केपाणी आहे. शहराला २८ दिवस पुरेल एव्हढाच पाणी साठा धरणात आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com