Hearing on Shivsena : निकालानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाचा जल्लोष!

शिंदे, फडणवीस सरकार वाचल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Hearing on Shivsena : सोळा आमदारांची अपात्रता तसेच एकंदरच सत्तांतराच्या नाट्यावरील सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. त्यात राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सध्या तीर तरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. (Shinde group`s workers distribute sweets in party Office)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार वाचले. त्यामुळे शिवसेना (शिंदे) (Shivsena) गटाला दिलासा मिळाला आहे. त्याचा आनंद नाशिकच्या (Nashik) कार्यालयात जल्लोष करून साजरा झाला.

Eknath Shinde
Shivsena MLA News: `ते` आमदार रात्रभर झोपलेच नाही?...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह सोळा आमदारांना अपात्र ठरविण्यात येणार की नाही याबाबतचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे राज्यातील सरकार सध्या तरी वाचले आहे. त्याचा आनंद कार्यकर्ते, नेत्यांनी साजरा केला. आज सकाळपासूनच याबाबत कार्यकर्ते, नेत्यांना मोठी उत्सुकता होती.

कार्यकर्ते सतत याबाबत चौकशी करीत होती. सकाळपासूनच शिवाजी भोर, अजय बोरस्ते, शोभा मगर, सुर्यकांत लवटे, उमेश चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, सुदाम ढेमसे, प्रताप मेहरोलीया, लक्ष्मी ताठे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Eknath Shinde
Narhari Zirwal Statement: ''माझ्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला नाही!''; झिरवळांचं मोठं विधान

दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. राज्यातील सरकार वाचले आहे. ते यापुढेही जनहिताचे काम करीत राहील. त्यामुळे नागरिकांत देखील आनंद आहेत. न्यायालयाचा निकाल आम्ही स्विकारतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in