Dhadgaon News; विजय पराडके यांनी फडकवला शिंदे गटाचा झेंडा!

धडगाव तालुक्यात २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे (शिंदे गट) सरपंच, तर काँग्रेस १६ दुसऱ्या स्थानी
Vijaydada Brothers
Vijaydada BrothersSarkarnama

धडगाव : (Nandurbar) तालुक्यातील ४७ निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य विजयदादा पराडके (Vijaydada Paradke) यांनी सर्वच पक्षांना यशस्वी आव्हान दिले. त्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) (Shivsena) सर्वाधीक बावीस सरपंच विजयी झाले. त्यामुळे तालुक्यात लढत रंगली ती काँग्रेस (Congress) विरूद्ध पराडके परिवार यांच्यात. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पराडके यांनी विरोधकांपुढे चांगलेच आव्हान उभे केले आहे. (ZP member Vijay Paradke host Shinde group`s flag in Dhadgaon)

Vijaydada Brothers
Grampanchayat News; राष्ट्रवादी काँग्रेसच नंबर वन!

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर माघारीअंती तीन ग्रामपंचायती बिनविरोध घोषित झाल्या. उर्वरित ४४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींवर येजिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते विजयसिंग पराडके, शिक्षण सभापती गणेश पराडके, तसेच जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Vijaydada Brothers
Dada Bhuse News; दादा भुसे समर्थकांनी महाजन समर्थकांचा सहज पराभव केला

तालुक्यात १६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस, सात ग्रामपंचायतींवर भाजप व दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. विशेष म्हणजे सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ४७ ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. यात शिवसेना (शिंदे गट) नेते विजयसिंग पराडके यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी सर्वाधिक ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात दिल्याने शिवसेना (शिंदे गट) गोटात उत्साह होता.

काल जसजसे निकाल जाहीर होत होते तसतसे उमेदवारांमध्ये जल्लोष होत होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पर पडली.

शिंदे गट विजयी ग्रामपंचायती

गेंदा, शेलदा, वावी, कुंभरी, पिंपळबारी, राजबर्डी, त्रिशूल, कुकतार, कामोद खुर्द, मांडवी बुद्रुक, बिजरी, बिलगाव, भाबरी, अट्टी, जुगणी, कात्रा, तेलखडी, थुवाणी, रोषममाळ खुर्द, फलाई, कुंड्या, कुवरखेत.

काँग्रेस विजयी ग्रामपंचायती

माळ, सिरसाणी, सावऱ्या, खडकला, वलवाल, निगदी, खुटवडा, मांडवी खुर्द, चिखली, बोदला, दुट्टल, डोमखेडी, भमाना, झापी, उडद्या, चांदसैली.

भारतीय जनता पक्षाला तोरणमाळ, शेलकुवी, मक्तरझिरा, गौऱ्या, कुकलट, केलापाणी, सिंधीदिगर या सात ठिकाणी तर खडकी आणि भादल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in