संजय राऊतांना वेळेवर चुना लावीन!

गुलाबराव पाटील यांनी टिका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
Sanjay Raut & Gulabrao Patil
Sanjay Raut & Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : पानाला चुना कसा लावतात, हे अद्याप संजय राऊत (Sanjay Raut) यांना माहीत नाही. मात्र, वेळ येईल तेव्हा त्यांना मी चुना लावीन, असा सणसणीत टोला शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. (Gulanrao Patil criticised Shivsena leader Sanjay Raut on his Statement)

राज्याचे मंत्री व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. टपरीवरील आमदाराला पुन्हा पान लावण्यासाठी टपरीवर बसावे लागले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. संपूर्ण महाराष्टात ही टीका गाजली होती.

गुवहाटी येथे हॉटेलमध्ये बुधवारी (ता. २९) सर्व बंडखोर आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या बैठकीत बोलताना गुलाबराव पाटील यांनी खासदार राऊत यांना जबरदस्त टोला लगावला. ते म्हणाले, की संजय राऊत मला पुन्हा पानटपरीवर चुना लावत बसेल, असे म्हणतात. मात्र, पानाला चुना कसा लावतात, त्यांना माहीत आहे का? वेळ आल्यावर मी त्यांना नक्की चुना लावीन.

उद्धव ठाकरे पवारांना सोडत नाहीत

आपल्यासोबतचे ४० व अपक्ष आमदार सभागृहात डिबेट करण्यासाठी त्यांना पुरेसे आहोत, असे मत व्यक्त करून गुलाबराव पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांना आपण याबाबत सर्व सांगितले. मात्र, त्यांनी ऐकलेच नाही. त्यांनी आपल्याला सोडले, ‘वर्षा’ सोडले. मात्र, ते शरद पवार यांना सोडण्यास तयार नाहीत.

आमचाही त्याग आहे

आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपद मिळाले, हे निश्‍चित आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, की आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केले आहे. कठीण परिस्थितीत आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवूनही कार्य केले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात आमच्या कामाचाही सहभाग निश्‍चित आहे. आम्ही काही केवळ आयत्या बिळावर नागोबा नाहीत. त्यामुळे आगामी काळासाठी आपण सर्व एकत्र राहून लढाई लढणार आहोत. एकनाथ शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया, एवढीच आपण देवासमोर प्रार्थना करीत आहोत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com