Bhausaheb Choudhary
Bhausaheb ChoudharySarkarnama

Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

शिवसेनेतील बंडखोरी व राजकीय पडझडीत लोकप्रतिनिधी गेले तरी नेते, कार्यकर्ते जागेवरच.

नाशिक : धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच (Shivsena) आहे आणि शिवसेनेचेच राहणार, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. राजकीय घडामोडी घडत असल्या, तरी शिवसेनेचा कणा बूथप्रमुख (Booth) व गटप्रमुख (Gat pramukh) आहे. त्यांच्यामार्फत निवडणुकीची तयारी सुरू आहे. बंडखोरीचा काहीही परिणाम शिवसेनेच्या मिशन महापालिकेवर (NMC) होणार नाही, असे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी सांगितले. (Shivsena mla, MP may leave party but common suporters are still with Shivsena)

Bhausaheb Choudhary
कार्यालयांमध्ये महिलांसाठी विशाखा समिती स्थापन करा!

महापालिका निवडणुकीसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा देणाऱ्या शिवसेनेत राजकीय पडझडीनंतर सन्नाटा पसरला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत नेते हलत असले तरी शिवसैनिक मात्र जागेवरच आहेत. आता भाजप व अन्य पक्ष काय करतात, यापेक्षा धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्याकडेच राहावे, यासाठी शिवसैनिकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.

Bhausaheb Choudhary
उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदाराच्या भगिनीची निष्ठेची मोठी भेट!

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री व डझनभर मंत्री पदे मिळविल्यानंतर शिवसेना व शिवसैनिकांमध्ये ऊर्जा संचारली. शिवसेनेचा वारू चौफेर उधळत असताना नेत्यांच्या भाषा बदलल्या. नाशिक महापालिकेत ‘हंड्रेड प्लस’चा नारा देण्यात आला. निवडणुका झाल्या. सत्ताधारी भाजप चारीमुंड्या चीत होऊन शिवसेना सत्तेतील असे वातावरण तयार झाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणुका लांबल्या. वेळेत निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित ‘हंड्रेड प्लस’ नसले तरी मतांचा टक्का वाढून काही जागांचा लाभ झाला असता. मात्र ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळे चूल मांडत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. या सरकारला ‘शिंदे सरकार’ म्हटले जाते, शिंदे सरकारने शिवसेना संघटनेलाच आव्हान देत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करताना धनुष्यबाण या चिन्हावरच हक्क सांगितला. त्या अनुषंगाने आता न्यायालयीन लढाई सुरू आहे.

शिवसेना फुटली तरी काही अडचण नाही, पुन्हा उभारी घेता येईल. परंतु शिवसेनेच्या चिन्हावर शिंदे गटाने केलेला दावा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. या भूमिकेमुळे शिवसैनिक सुन्न झाले आहेत. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना भाजपमध्ये काय चालले किंवा यापूर्वी त्यांनी काय केले, हा विषय सध्या शिवसेनेच्या दृष्टीने बाजूला पडला आहे. मतदारांवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रभाव व विश्‍वास आहे. हे चिन्ह गायब झाल्यावर काय होईल...या विचारात शिवसैनिक आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in