Shivsena news; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच नाशिकच्या मैदानात

जानेवारीअखेर ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला येण्याचे नियोजन
Uddhav Thackrey
Uddhav ThackreySarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये (Nashik) येत आहे. ठाकरे यांच्या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच नवीन नियुक्त्यांची शक्यता आहे. (Uddhav Thackrey will be on Nashik visit in the current month)

Uddhav Thackrey
Bjp News : फ्लाॅप सभेमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली ; उद्धवसेनेनेही डिवचले..

जून महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपसोबत घरोबा करताना सत्तादेखील स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असा सरळसरळ सामना रंगला.

Uddhav Thackrey
Election News; पदविधर निवडणुकीमुळे ४१३ कोटींच्या कामांना ब्रेक

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याची भूमिका घेतली. संघटनेच्या चिन्हावरच त्यांनी दावा केल्यानंतर वाद टोकाला गेला. शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या मुंबई, ठाणे नाशिक व औरंगाबाद या प्रमुख शहरांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई सोडलेली नाही. मात्र, आता नववर्षाचे निमित्त साधून ते पक्षाच्या बालेकिल्ल्याची डागडुजी करण्यासाठी मैदानात उतरत आहे.

त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये संघटना बळकटीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी नाशिकमध्ये दोन दिवसाचे नियोजन केले आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी नाशिकला येणार असल्याचे सांगितले. अशी माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com