अक्कलकुवा येथे दगडफेकीत शिवसेना कार्यालयाचे नुकसान

अक्कलकुवा येथे मध्यरात्री जमावाच्या दगडफेकीत वाहनांचे नुकसान झाले.
अक्कलकुवा येथे दगडफेकीत शिवसेना कार्यालयाचे नुकसान
Tense in AkkalkuvaSarkarnama

अक्कलकुवा : अक्कलकुवा (Nandurbar) येथे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्याच्या वादातून मध्यरात्री जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यात दुचाकी व चारचाकी, दुकान, घराच्या दरवाजे-खिडक्यांचे तोडफोडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दगडफेकीत (Stone pelting) शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाचेही नुकसान झाले. (Tension create in city after post viral on social media)

Tense in Akkalkuva
राज्यसभेच्या विजयानंतर फडणवीसांनी दिला विधानपरिषदेच्या यशाचा कानमंत्र

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील रात्रीच अक्कलकुवा येथे दाखल झाले. सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या शांततेचे वातावरण आहे. आजदिवसभर येथील बाजारपेठ बंद होती. शहरात शुकशुकाट होता. या प्रकरणात दीडशे जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, ४७ जणांची ओळख पटली आहे. यातील २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tense in Akkalkuva
नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही!

राज्यातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या नूपुर शर्मा प्रकरणी वादाचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात पाहायला मिळाले. व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्याच्या वादातून शुक्रवारी (ता. १०) संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी समज दिल्यानंतरही पोलिस ठाण्यामधून परतत असताना काही जणांनी मध्यरात्री १२ नंतर तुफान दगडफेक केली. दगडफेकीनंतर वातावरण चिघळले होते. अक्कलकुवा शहरातील झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरिमाता मंदिर परिसरात दुचाकी व चारचाकी गाड्यांचे दगडफेकीत नुकसान झाले आहे.

अक्कलकुवा शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, नंदुरबार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात तळ ठोकून आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

अक्कलकुवा येथे वारंवार अशा घटना घडत असल्याने त्याच्या निषेधार्थ शहरवासी, व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. संबंधित घटनेच्या निषेधार्थ व शहरात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी व्यापारी वर्गानेही पोलिस विभागाला निवेदन दिले.

शिवसेना कार्यालयाचे नुकसान

अक्कलकुवा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या खिडक्यांची तावदाने दगडफेकीत फुटली असून, वातानुकूलित यंत्रांचे देखील दगड मारून नुकसान केल्याचे दिसून आले. याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख रावेद्रसिंह चंदेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक दाखल

घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. सहाय्यक जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

...

अक्कलकुवा शहरात शांतता आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

-पी. आर.पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in