रोहिणी खडसे हल्ला; शिवसेना नेत्यांविरोधात गुन्हा दाखल!

पोलिसांनी चोविस तासांचा अल्टीमेटम देताच शिवसेनेच्या तीघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
NCP Leader Rohini Khadse

NCP Leader Rohini Khadse

Sarkarnama

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या कारवरील हल्ल्याबाबत पक्षाचे नेते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांनी चोविस तासांचा अल्टीमेटम देताच याबाबत शिवसेनेच्या (Shivsena) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील राजकीय तणाव आगामी काळात आणखी वाढणार आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सुनील पाटील, चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी, छोटू भोई यांच्या विरोधात कलम ३०७, ३४१, ४२७, १४१, १४३, १४७, १४८, १४९ आर्म ऍक्ट २५(३),२५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे तपास करीत आहेत.

<div class="paragraphs"><p>NCP Leader Rohini Khadse</p></div>
खडसे म्हणाल्या, `शिवसेनेच्या हल्लेखोराने माझ्यावर पिस्तूल रोखले`

यासंदर्भात येत्या २४ तासात हल्लेखोरांना अटक करा अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिला आहे. या हल्ल्यामागे राजकीय पार्श्वभूमी आहे. पोलिसांना सर्व माहिती असून त्यांच्यावर कारवाई करावी व २४ तासांत हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

सोमवारी रात्री ज्या हल्लेखोरांनी केलेला सशस्त्र हल्ला हा केवळ धमकावण्यासाठी नव्हे तर जिवे मारण्याच्याच उद्देशाने केल्याचा दावा करत ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी हल्लेखोर शिवसेनेचे पदाधिकारी व आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला.

<div class="paragraphs"><p>NCP Leader Rohini Khadse</p></div>
भागवत कराड यांनी दिले दोंडाईचाला ५० कोटी गिफ्ट!

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसेंवर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात पडसाद उमटले. मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. जळगावात महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

रोहिणी खडसेंनी हल्ल्याची माहिती देताना हल्लेखोरांची नावेही आज उघड केली. यात शिवसेनेचा विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भाई व चांगदेवचे माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या धक्काबुक्की केल्याचा आरोप खडसे यांनी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com