
Nashik:राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातला संघर्ष नवा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नाशिकमधील भुजबळ- कांदे वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता. आता राज्यातील सत्तांतरानंतर तर आमदार कांदेंनी भुजबळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस असून माझ्यासमोर त्यांनी कधीही उभं राहावं, माझं त्यांना थेट खुलं आव्हानही दिलं आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी (दि.३०) मतदान होत आहे. याच धर्तीवर आमदार सुहास कांदे(Suhas Kande) यांनी छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांनी मागील काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात चांगलंच तापलं आहे. आता पुन्हा एकदा कांदेंनी थेट आव्हान देत भुजबळांना डिवचलं आहे.
नांदगाव आणि मनमाड बाजार समितीचा निकाल अद्याप बाकी आहे. नांदगाव बाजार समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर मनमाड बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया सुरु आहे. सायंकाळी ही मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर नांदगाव बाजार समितीची निवडणूक मतमोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर या बाजार समितीवर कुणाचा झेंडा असणार हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी सुहास कांदे यांनी छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांना निवडणुकीला उभे राहण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांचा निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी(Ncp)सह अनेक नेत्यांनी केला आहे.याचवेळी आता कांदेंचं वर्चस्व असलेल्या नांदगाव आणि मनमाड बाजार समितीचा निकाल अद्याप बाकी आहे. नांदगाव बाजार समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
तर मनमाड बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया सुरु आहे. या बाजार समित्यांवर त्यांचं वर्चस्व राहणार की भुजबळ कांदेंच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. यावेळी विकासाच्या मुद्द्यांवर कांदे यांना आपल्या पॅनेलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल विरुद्ध तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांच्या महाविकास आघाडी परिवर्तन यांच्यात मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी थेट लढत होत आहे. या निवडणुकीत कांदे आणि भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ(Pankaj Bhujbal) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.