निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

निफाड नगरपंचायतीत शिवसेनेने सात जागा जिंकून जागा राखला.
Niphad Nagar Panchayat Election Result Update
Niphad Nagar Panchayat Election Result UpdateSarkarnama

निफाड : आज झालेल्या निफाड नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना व शहर विकास आघाडीने सत्ता राखली. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांना त्यांनी चांगलाच राजकीय धक्का दिला आहे. (Niphad Nagar Panchayat Election Result Update)

Niphad Nagar Panchayat Election Result Update
नाशिक महापालिकेत भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्या नावाने बदल्यांचे रॅकेट?

निफाडला आज सकाळी मतमोजणी झाली. त्यात शिवसेना व शहर विकास आघाडीने आपला झेंडा रोवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्यांचा स्वप्नभंग झाला. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम येथे बाजीगर ठरले. शिवसेनेला सात व शहर विकास आघाडी ४, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर बसपा व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली.

Niphad Nagar Panchayat Election Result Update
महापालिकेचे अजब तर्कट, म्हणे नागरिकांनी द्यावा कचऱ्यासाठी `यूजर चार्जेस`

आज जाहीर झालेल्या निकालातील विजयी उमेदवार असे, प्रभाग १ : अरूंधती पवार (बसपा), प्रभाग २ : किशोर ढेपले (अपक्ष), प्रभाग ३ : अनिल कुंदे (शिवसेना), प्रभाग ४ : शारदा नंदू कापसे (शिवसेना), प्रभाग ५ : पल्लवी जंगम (काँग्रेस), प्रभाग ६ : साहेबराव बर्डे (शहर विकास आघाडी), प्रभाग ७ : विमल जाधव (शिवसेना), प्रभाग ८ : सुलोचना धारराव (शिवसेना), प्रभाग ९ : सागर कुंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग १० : डॅा. कविता धारराव (शिवसेना), प्रभाग ११ : संदीप जेऊघाले (शिवसेना), प्रभाग १२ : रत्नमाला कापसे (शिवसेना).

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com