१७ वर्षांपासून सुरु आहे शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सांत्वन यात्रा

धुळे येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला भाऊबीजेची भेट देताना कैलास पाटील. शेजारी शिवसेनेचे पदाधिकारी.
Shivsena leaders with farmers family
Shivsena leaders with farmers familySarkarnama

धुळे : भाऊबीजेला (Diwali) शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटातर्फे (Uddhav Thackrey Group) धुळे तालुक्यात सांत्वन यात्रा काढण्यात आली. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी ( Sucidal family) कुटुंबासोबत भाऊबीज साजरी करत धीर देण्यात आला. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या संकल्पनेतून २००५ पासून ही सांत्वन यात्रा काढली जात आहे. यंदा या उपक्रमाचे १७ वे वर्ष होते. (Shivsena implementing a drive for Sucidal farmers family)

Shivsena leaders with farmers family
RTI ACT; धुळ्यात टोळी सक्रीय, थेट पैशांची होतेय मागणी

शहर शिवसेनेतर्फे गेली सतरा वर्षे हा उपक्रम आहे. त्यात सातत्याने विविध उपक्रम करून या कुटुंबाना धीर देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा उपक्रम चर्चेचा विषय राहिला आहे.

Shivsena leaders with farmers family
अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. आतपर्यंत तब्बल ११ हजाराहून अधिक शेतकऱ्यां‍नी कर्जबाजारीपणातून जीवनयात्रा संपविली आहे. विशेषतः धुळे व शिंदखेडा तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. बोरविहीर (ता. धुळे) येथे २००५ ला पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्यामुळे पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी माजी आमदार पाटील पाठपुरावा करत असतात. यंदा धुळे तालुक्यात ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पैकी सात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरीत प्रकरणे मदतीपासून वंचित आहेत. काही प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबीत आहेत.

भाऊबीजेनिमित्त धुळे तालुक्यात सकाळी नऊपासून पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देत साडीचोळीचा आहेर देण्यात आला. माजी आमदार प्रा. पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करनकाळ, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, युवा नेते यशवर्धन कदमबांडे, माजी सभापती कैलास पाटील, तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर वाघ, धनराज पाटील, मनीष जोशी, तुषार भामरे, कमलेश भामरे, विवेक पाटील, मेहेरगावचे सरपंच महेंद्र भामरे, प्रभाकर भामरे, अस्लम पिंजारी, अर्जुन गायकवाड, भगवान पाटील, रमेश पाटील, मंगलसिंग सूर्यवंशी, देवीदास माळी आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in