Nashik News; शिवसेना सुपरस्टार सुधाकर बडगुजर यांनी सलमान खानलाही मागे टाकले!

साडे चारला नाशिकच्या कोर्टात शिक्षा, लगेच जामीन, सहाला स्थगिती मुंबईच्या उच्च न्यायालयात!
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama

नाशिक : (Nashik) शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना लोसकभा निवडणुकीच्या मतदानावेळी शासकीय (Government) कामकाजात अडथळ्याच्या खटल्यात दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सत्र न्यायालयाने (Court) साडे चारला शिक्षा सुनावली, पाचला ऑर्डर झाली आणि सहाला मुंबईत (Mumbai) उच्च न्यायालयाने (High Court) त्यांना जामीन मंजूर केला. हे एव्हढे वेगाने घडले की त्यांच्या विरोधकांचा आनंद तासभरच टिकला. (Shivsena leader Sudhakar Badgujar get bail in just a hour from HC)

Sudhakar Badgujar
Dada Bhuse News; शिवजयंती सजावटीवरून दादा भुसे आणि अद्वय हिरे वाद पेटला

माजी सभागृह नेते बडगुजर यांचा खटला, शिक्षा, जामीन आणि अपील यातील वेग आणि तप्तरता हे सर्व सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या फुटपाथवर झोपलेल्यांच्या मृत्यू प्रकरणातील खटल्यातील शिक्षेवरील जामीन प्रकरणाची आठवण करून देणारे होते. त्यामुळे बडगुजर देखील नाशिकच्या शिवसेनेचे सुपरस्टार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

Sudhakar Badgujar
Trible News; विजयकुमार गावित धावले विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मदतीला

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणजे महापालिकेच्या राजकारणातील बडे प्रस्थ. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात एकनाथ शिंदे गटासह सगळ्यांच्याच टार्गेटवर असतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही या खटल्याला विशेष महत्त्व आहे.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीदरम्यान सिडकोत पोलिस अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सुधाकर भिकाजी बडगुजर (वय ४५, रा. स्वामी निवास बंगला, सर्वोदय कॉलनी, सावतानगर, सिडको), ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर (२५, रा. सर्वोदय कॉलनी, सावतानगर), राकेश निंबा शिरसाठ (३०, रा. कैलास रो-हाउस, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, येथील मनपा विद्यानिकेतन शाळेत २४ एप्रिल २०१४ ला दुपारी चारला तिघे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी पोलिस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्यांचे उल्लंघन करून सहाय्यक पोलिस आयुक्त हेमराजसिंह राजपूत व तक्रारदार पोलिसांना सरकारी कामकाज करीत असताना अडथळा आणला. राजपूत यांच्यावर धावून जात, ‘तू राष्ट्रवादीला मिळाला आहे, तू आमचे काहीएक करू शकत नाही’, अशी भाषा वापरून हुज्जत घातली होती.

Sudhakar Badgujar
Nashik News; डॉ. भारती पवार स्वतः म्हणाल्या कांदा उत्पादक अडचणीत!

न्यायालयाचे परखड मत

या खटल्यासंदर्भात शिक्षा सुनावताना न्यायालयाने परखड मत व्यक्त करतानाच, पोलिसांवरील होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. २०११ ते २०१५ दरम्यान महाराष्ट्र राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या १७ हजार ६८२ केसेस झालेल्या आहेत. खटल्यांचा हा डाटा अत्यंत गंभीर आहे आणि धोक्याची घंटा देणारा आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवर हल्ला हा दुर्दैवाने कायदा व सुव्यवस्थेवरचा हल्ला, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. लोकसभा मतदानादिवशी पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे, त्यामुळे कठोर शिक्षा देणे यथोचित राहील, असे न्यायालयाने मत व्यक्त केले. दरम्यान, या खटल्यातील आरोपींना सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर एक महिन्यासाठी जामीन मंजूर केला आहे.

२४ एप्रिल २०१४ ला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रायगड चौकातील मतदान केंद्रावर वाद झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्याची पोलिसांना विचारणा केली असता, कोणताही दोष नसताना चुकीचा गुन्हा आमच्यावर दाखल केला. मात्र, त्याच दिवशी पोलिसांनी शहरात १४ ठिकाणी सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे दाखल केले. त्यात १३ जण निर्दोष सुटले. मात्र, मला नैसर्गिक न्याय मिळाला नाही, याची खंत आहे. नैसर्गिक न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायदेवतेवर विश्वास असून, मला न्याय मिळेल.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com