Shivsena News: `भाजप`ला लायक उमेदवारही मिळत नाही

Subhash Desai: सुभाष देसाई यांनी भाजपवर खरमरीत करीत, ते इतर पक्षातील उमेदवारांना पळवितात असा आरोप केला.
Subhash Desai
Subhash DesaiSarkarnama

नाशिक : (Nashik) भाजपरूपी (BJP) कौरवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) पदवीधर आणि सुशिक्षित मतदारांनी व्यक्त व्हावे. पदवीधर मतदार हीन राजकारणाला रोखठोक उत्तर देतील, असा दावा शिवसेनेचे (Shivsena) वरिष्ठ नेते, माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला. (BJP not even given a candidate in Graduate constituency election)

महाविकास आघाडीतर्फे आज शुभांगी पाटील यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या प्रचारार्थ ही बैठक झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

Subhash Desai
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी मुंबईत असताना उद्धव ठाकरे ही मुंबईतच होते; पण...

यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, सचिव विनायक राऊत, नेते खासदार अरविंद सावंत, उमेदवार श्रीमती पाटील, शिवसेनेचे पाचही जिल्हाप्रमुख आणि आमदार, माजी आमदार, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, काँग्रेसच्या हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड आदी महाविकास आघाडी नेते उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, पदवीधर मतदार हे सुशिक्षित सुजाण मतदार असतात. भाजपकडे पात्र, लायक उमेदवार मिळत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष इतर पक्षातील उमेदवारांना पळवितात. खासदार सावंत म्हणाले, या देशात जात-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू असताना काँग्रेसतर्फे भारत जोडो सुरू आहे, म्हणून शिवसेना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहे.

Subhash Desai
Pune News : प्रजासत्ताक दिनी 189 कैदी तुरूंगातून होणार 'स्वतंत्र', कार्यवाहीला सुरूवात!

श्री. राऊत म्हणाले, दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबईवर सत्ता मिळविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात, त्यांच्या सभेला नागरिकांना फसवून आणले जात आहे. भाजपरूपी कौरवसेना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. श्री आव्हाड यांनी पदवीधर काँग्रेस निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शुभांगी पाटील यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com