Shivsena news : शिवसेनेच्या संभाजीराजेंनी लावला तहसीलमधील मनमानीला चाप!

संभाजीराजे पवार यांचा आंदोलनाच्या दणक्याने तहसीलदारा कार्यालयातील कर्मचारी वरमले.
Sambhajiraje Pawar & Shivsena leaders.
Sambhajiraje Pawar & Shivsena leaders.Sarkarnama

Yeola Shivsena news : सर्वसामान्य नागरिकांना येथील तहसील कार्यालयात येणारे विदारक अनुभव नविन नाहीत. असाच उद्धटपणा व मनमानीचा अनुभव एका शेतकऱ्याला आला आहे. याबाबत विचारणा करणारे शिवसेना नेते व माजी सभापती संभाजीराजे पवार यांनाही असाच अनुभव आल्याने त्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडून आक्रमक होत जाब विचारला. (Revenue department employees always missbehave with People)

शिवसेनेच्या (Shivsena) या आंदोलनानंतर संबंधीत कर्मचाऱ्याने नरमाईची भूमिका घेतल्याने हा विषय थांबला. मात्र, येथील काही कर्मचाऱ्यांच्या मनमानीला ब्रेक लावण्याची गरज या निमित्ताने पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे (Shivsena) आंदोलन झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Sambhajiraje Pawar & Shivsena leaders.
Suhas Kande News: अपात्रतेचा निकाल येणारच नाही...हे आहे कारण!

शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविण्यात माजी सभापती श्री. पवार नेहमीच एक पाऊल पुढे असतात. शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात त्यांनी रुद्रावतार धारण करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मनमानीला चाप लावत चांगलाच धडा शिकविला. खिर्डीसाठे (ता. येवला) येथील शेतकरी संदीप नागरे हे तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना या कर्मचाऱ्याने यादी न देता उडवाउडवीचे उत्तर दिले.

त्यानंतर नागरे यांनी तहसीलदार आबासाहेब महाजन यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. त्यावर श्री. महाजन यांनी दुरध्वनीद्वारे सूचना केल्याचा संबंधित अधिकाऱ्याला राग आला. त्यातून या कर्मचाऱ्याने नागरे यांना थेट धक्काबुक्की करून कार्यालयातूनच काढून दिले. ही मनमानी सहन न झाल्याने नागरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती शिवसेना नेते पवार यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. पवार यांनीही तत्काळ दखल घेत बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह तहसील कार्यालय गाठले. यावेळी समर्थकांसह ५० शेतकरी उपस्थित होते. मात्र, संबंधित अधिकारी जेवणासाठी घरी गेल्याचे कारण सांगत कार्यालयात येण्याचे टाळत होता.

Sambhajiraje Pawar & Shivsena leaders.
Nashik BJP News: भाजप शहराध्यक्षपदासाठी महापालिका ठेकेदारांचे लॉबिंग?

हा प्रकार लक्षात आल्यावार पवार यांनी आक्रमक होत शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याची भूमिका घेतली. कर्मचाऱ्याला तत्काळ बोलवा व माफी मागायला लावा, नाहीतर येथेच आंदोलन सुरु करतो अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावर नायब तहसीलदार पंकजा मगर यांनी मध्यस्थी केली. तसेच, संबधित कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलावले. त्यावेळीही पवारांनी संतप्त होऊन जाब विचारला. उर्मटपणे बोलणाऱ्या या कर्मचाऱ्याने अखेर नरमाईची भूमिका घेत नागरे यांना हवी असलेली यादी दिली. त्यामुळे हे आंदोलन शमले.

--

ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची कामे न अडवता केली पाहिजे. मात्र, त्यांना चकरा मारायला लावल्या जातात. याबाबत वारंवार तक्रारी येतात. तहसील कार्यालयात काम करताना अडवणूक केली जाते आहे. या शेतकऱ्याला तर धक्काबुक्कीही झाल्याने जाब विचारावा लागला. असा मनमानीचा प्रकार कोणत्याही कार्यालयात सहन केला जाणार नाही.

-संभाजीराजे पवार, शिवसेना नेते, येवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in