धुळे महापालिकेच्या अनधिकृत मालकांना सळो की पळो करू!

शिवसेना नेते मनोज मोरे यांचे पाणीप्रश्‍नी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
Manoj More, Shivsena leader, Dhule Latest Marathi News updates, Manoj More News
Manoj More, Shivsena leader, Dhule Latest Marathi News updates, Manoj More NewsSarkarnama

धुळे : मुबलक पाणी (Water) असताना, शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना दिलेल्या असताना केवळ भ्रष्टाचार व टक्केवारीचे (Commission) व्यसन जडल्यामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला. परिणामी नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होऊ शकत नाही. महापालिकेतील (Dhule Corporation) सत्ताधाऱ्यांचे हे अपयश आहे अशी टीका शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख मनोज मोरे (Manoj More) यांनी केली आहे. (Dhule Latest Marathi News updates)

Manoj More, Shivsena leader, Dhule Latest Marathi News updates, Manoj More News
मी मंजूर केलेली कामे देखील भाजपला करता आली नाही!

धुळे शहरवासीयांना दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन झाले नाही तर शिवसेना घळभरो आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.

शहरात सध्या दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने धुळेकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. रणरणत्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी असताना हे हाल होत आहेत हे चित्र पाहून मन हेलावून गेले आहे. युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात ३५० किलोमीटर जलवाहिनी टाकली आहे. नवीन सात जलकुंभ बांधून तयार आहेत. मात्र ही योजना कार्यान्वित न करण्यामागे काय गौडबंगाल आहे हा धुळेकरांसाठी अनुत्तरित प्रश्‍न असल्याचे श्री. मोरे यांनी म्हटले आहे.

Manoj More, Shivsena leader, Dhule Latest Marathi News updates, Manoj More News
हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान!

आगामी २५ वर्षाचा विचार करून शासनाने शेकडो कोटींच्या योजना शहराला दिल्या. मात्र भ्रष्टाचार व टक्केवारीचे व्यसन जडलेल्या महापालिकेत या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे पुढचे २५ जाऊ द्या सद्यःस्थितीतही नियमित पाणीपुरवठा होऊ शकत नाही व हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. काही पुढारी कंबरेएवढ्या खड्ड्यात उतरून पाइपलाइन मोजत होते, ठेकेदार घुले पाणीपुरवठा योजनेच काम निकृष्ट करत असल्याचे ओरडून सांगत होते. मग त्याच ठेकेदाराला अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम कसे दिले. मुंबईतल्या बैठकीत असे काय शिजले की घुले अचानक चांगला झाला अशी विचारणा श्री. मोरे यांनी केली आहे.

राज्याच्या नेतृत्वाचे डोहाळे लागलेल्या स्थानिक पुढाऱ्यांनो अंधारात दिवे लावण्यापेक्षा सत्ता मिळालेल्या पालिकेत दिवे लावा. दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल असे नियोजन करा अन्यथा पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांसोबत शिवसेना आक्रमक घळभरो आंदोलन छेडेल, मनपाच्या अनधिकृत मालकांना सळो की पळो करून सोडेल असा इशारा श्री. मोरे यांनी दिला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com