पवार अन् राष्ट्रवादीला मी कायम विरोध केला पण त्यांनीच मंत्री केलं! गुलाबराव पाटलांची कबुली

शरद पवारांच्या समोरच शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी कबुली दिली आहे.
Sharad Pawar and Gulabrao Patil
Sharad Pawar and Gulabrao Patil Sarkarnama

जळगाव : शरद पवार (Sharad Pawar) हे जादूगार आहेत. त्यांनी जादू चालवून राज्यात काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आणले. पवार आणि राष्टवादी काँग्रेसच्या विरोधात मी कायम बोलत आलो, तरीही त्यांच्यामुळं मला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाली, अशी कबुली शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज जाहीररीत्या दिली.

चांदसर (ता.धरणगाव ) येथे माजी आमदार मु.ग.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी पवारांमुळे मंत्रिपद मिळाल्याचा उल्लेख करुन त्यांचं तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, माजी आमदार मु.ग.पवार यांनी शेतकरी आणि शेतीप्रश्‍नासाठी सतत संघर्ष केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण राजकीय धडे घेतले. त्यांनी वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. आज हा कारखाना बंद आहे. मात्र, हा कारखाना आजही सुरू होऊ शकतो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उघडून हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

Sharad Pawar and Gulabrao Patil
घरबसल्या दहा-पंधरा ट्विट करुन रडीचा डाव खेळतात! जयंत पाटलांचा रोख कुणावर?

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याविरूध्द चौदा ट्विट केले होते. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाव न घेता फडणवीसांना टोला लगावला. ते म्हणाले की, पवार हे राज्यभर फिरून सर्व सामान्यांशी नाळ जोडत असतात. शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर शेतकरी दिंडी काढून शरद पवार हे महाराष्ट्रभर जनसंपर्क करीत असतात. याचवेळी काही जण मात्र, घरबसल्याच दहा-पंधरा ट्विट करून रडीचा डाव खेळतात.

Sharad Pawar and Gulabrao Patil
पोलिसांचा प्रताप! आधीपासून तुरुंगात असलेल्या तिघांना बनवलं रामनवमीच्या हिंसाचारातील आरोपी

जयंत पाटील म्हणाले की, आमदार मु.ग.पवार यांनी आयुष्यभर शरद पवार यांना साथ दिली. ते जनतेच्या प्रश्‍नासाठी समरस होते. त्यांनी प्रत्येक लढ्यात शरद पवार यांची सोबत केली. शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी संघर्ष केला, जळगाव ते नागपूर पायी शेतकरी दिंडी काढली, तसेच ते महाराष्ट्रभर जनतेशी संपर्क करीत असतात. आज काही जण मात्र घरबसल्या दहा ते पंधरा ट्विट करून रडीचा डाव खेळत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com