Nandurbar News : मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर शिवसेनेचा गंभीर आक्षेप!

Shivsena leader Aamshya Padwi criticized Minister Vijaykumar Gavit Today-राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्यावर शिवसेनेने आज थेट गंभीर आरोप केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
Amshya Padvi & Vijaykumar Gavit
Amshya Padvi & Vijaykumar GavitSarkarnama

Shivsena leader on Dr. Vijaykumar Gavit : जेव्हा आदिवासींवर अत्याचार होतात, अन्या केला जातो, तेव्हा आदिवासी नेते गप्प का बसतात. ते तोंड का उघडत नाही. या मंत्री आणि नेत्यांकडून आदिवासींनी काय अपेक्षा करावी, असा सवाल करीत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर शिवसेना नेते, आमदार आमश्या पाडवी यांनी थेट हल्ला केला. (will Dr. Vijay Gavit clarify on Shivsena`sdemur about Trible community)

महाराष्ट्र सरकारचा (Maharashtra) योजना कश्या फसव्या आहेत हे दाखविण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी "होऊ द्या चर्चा" या टॅगलाईन वर आपआपल्या गावात जनतेचा समोर सरकारचा भांडाफोड करा असे आदेश राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Amshya Padvi & Vijaykumar Gavit
Cooperative News : धक्कादायक, राज्यातील निम्म्याहून अधिक सहकारी बॅंकांवर प्रशासक!

यासंदर्भात आज प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार आमश्या पाडवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तळोदा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील आमदार, खासदार हे आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात किंवा त्यांच्या विकासासाठी सरकारचा विरोधात लढत नाहीत. जेव्हा आदिवासी जनतेचा विषय येतो, तेव्हा हे नेते डोळे बंद का करून घेतात?. हे नेते फक्त निवडणूकीमध्ये निवडून येण्यासाठी आदिवासींचा उपयोग करतात.

Amshya Padvi & Vijaykumar Gavit
Nashik Shivsena news : ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा

ते पुढे म्हणाले, यापुढे कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या दाराशी आला तर त्याला तुम्ही गावाचा विकासासाठी काय केलं, हे विचारा. मुख्यमंत्री, मंत्र्यांना सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र आदिवासी जनजातीची मिटींग घेण्यासाठी वेळ नाही. त्यासाठी ते फक्त आणि फक्त तारीख पे तारीख देऊन ते वेळ काढूपणा करत आहे. त्यामुळे अशा आदिवासी द्वेष्ट्या सरकारला त्यांची जागा दाखवा.

यावेळी मंगल पावरा यांची तालुकाप्रमुख सोनू वळवी, उपविभाग प्रमुख दिनेश ठाकरे, तालुका संघटक कृष्णा पाडवी, तालुका उपप्रमुख रतीलाल वळवी, विभाग उपप्रमुख दिलीप वळवी, कोश्या ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.

Amshya Padvi & Vijaykumar Gavit
Dhule politics : महाराष्ट्रात एकही लव्ह जिहाद प्रकरण नाही, भाजप केवळ राजकारण करते!

उपजिल्हा प्रमुख आनंद सोनार, शहरप्रमुख जितेंद्र दुबे, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय पटेल, संजय गांधी समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण वळवी, युवासेना शहरप्रमुख जगदीश चौधरी, उपतालुका प्रमुख कशीनाथ कोळी, विजय मराठे, जयेश माळी, नितेश सोनार, विपुल कुलकर्णी, पुष्पेंद्र दुबे, संतोष चिते, नटवर ठाकरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in