आगामी निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज!

धरणगाव येथे शिवसेना मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज!
Gulabrao PatilSarkarnama

धरणगाव : ‘समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची (Shivsena) वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळत आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे आणि या सर्वांच्या ताकदीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Loacal body elections) निवडणुकांमध्ये शिवसेना भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे’, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. (Gulabrao Patil said shivsena is ready to face Upcoming elections)

Gulabrao Patil
विधवा प्रथेला मूठमाती देणारी टाकळी ठरली पहिली ग्रामपंचायत

येथील श्रीजी जिनिंगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

Gulabrao Patil
राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख बाद, शिवसेनेची मात्र चंगळ!

विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, गजानन चव्हाण, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मुंबईचे निरीक्षक प्रशांत सातपुते, सुमित बने, संतोष चांदे, शांताराम बने, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजनआदी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोचवण्याचे आवाहन केले. धरणगाव तालुक्यात शिवसेनेची स्थिती अतिशय मजबूत आहे. जिल्ह्यातील पहिला आमदार येथूनच मिळाला असून २५ वर्षांपासून येथे शिवसेनेचा आमदार आहे. १९९६ साली जिल्ह्यातील पहिला नगराध्यक्ष निवडून देण्याचा बहुमान धरणगावला मिळाला होता. आजही तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार, पाच पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेचे १५ सदस्य आहेत. आगामी काळात पूर्ण शक्ती पणाला लावून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला जाईल असे सांगून त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार शिवाय पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही पक्षाला यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त शिवसेना प्रमुख नसून ते एखाद्या कुटुंब प्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री कसे आहेत, याची उदाहरणे देत त्यांनी विविध लोकल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. पी. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन तर किरण अग्निहोत्री यांनी आभार मानले.

योग्य वेळी योग्य उत्तर देऊ

पालकमंत्र्यांनी खासदार उन्मेष पाटलांवर टिकास्त्र सोडले. खासदारांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान केलेले असतानाही त्यांनी आपल्या विरोधात उमेदवार दिला. खासदारांनी केलेल्या दगाफटक्याला योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले. शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त करत गद्दारांना धडा शिकवण्यात येईल, असा इशाराही दिला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in