Shivsena News: ...आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या डोळ्यात अश्रू तरळले

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मर्जी झाली असतो तर आज आमदार असतो.
Shivsena leaders at Sinner
Shivsena leaders at SinnerSarkarnama

सिन्नर : शिवसेना (Shivsena) हा सामान्य नागिरकांसाठी झगडणारा, झटणारा व त्यांच्या अडीअडचणीत धाऊन जाणारा पक्ष आहे. आमचा सर्व भर विकासावर (Devolopment) असतो. मी जर विधान परिषदेचा आमदार झालो असतो, तर सर्व निधी सिन्नरच्या विकासासाठी दिला असता, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (vijay Karanjkar) यांनी केले. (if i will be mlc whole fund shall spent on Sinner city)

Shivsena leaders at Sinner
शिवसेना कार्यकर्ते भाजप विरोधात पेटून उठतील!

सरदवाडी रस्त्यालगत प्रभाग अकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठी विकासकामे उभी केली. ती वाखाणण्याजोगी आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मर्जी चालली असती, तर आमदारकीचा सगळा निधी सिन्नरकरांच्या पदरात टाकला असता, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नमूद केले. चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे रहावे.

Shivsena leaders at Sinner
Malegaon News: भाजपने राज्यपालांची हाकालपट्टी न केल्यास महागात पडेल

शहरात अनेक विकासकामे केली आहेत. शंभर टक्के कामे झाली नसली, तरी तळागाळातील सर्वांना सोबत घेऊनच विकासकामे आम्ही करीत आलो आहोत. मूलभूत गरजा असलेले रस्ते, गटारी असे अनेक कामांना प्राधान्य दिले, यावेळी असे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.

माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, ज्योती वामने यांच्या प्रयत्नातून गंगोत्रीनगरमधील नगरपरिषदेच्या ओपन स्पेसवर भव्य उद्यान उभारले. मात्र, निधीअभावी खेळणी बसविण्याचे काम राहीले होते. सोमनाथ पावसे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून त्यांच्या मातोश्री (कै.) कमलबाई पावसे यांच्या स्मरणार्थ ॲड. भगवान कर्पे, सत्यभामा शिंगोटे, प्रवीण भांमरे, शिवाजी रेवगडे आदींच्या दातृत्वाने उद्यानात घसरगुंडी, सी-सॉ, झोका बसविण्यात आला. कोविड काळात प्रभागात कोविड सेंटर सुरू करून अनेकांना उपचार, काही घरगुती साहित्य दिले. कोविड काळात रुग्णांना पाठबळ देण्याचे काम केले, हे सर्व सांगत असताना, सोमनाथ पावशे व त्यांची पत्नी मेघा पावसे व नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com