गद्दारांनो, हिंमत असेल तर राजीनामा द्या!

शिवसेनेचा जळगावच्या आक्रोश मोर्चाला लोटली कार्यकर्त्यांची अफाट गर्दी.
Shivsena leaders at Jalgaon Meeting
Shivsena leaders at Jalgaon MeetingSarkarnama

जळगाव : शिवसेना (Shivsena) अंगार है, बाकी सब भंगार है, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांचा विजय असो, उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देत शिवसेनेतर्फे जळगावात (Jalgaon) भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यात बंडखोरी करणाऱ्या चार आमदारांचे पुतळे जाळण्यात आले. गद्दारांनो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, असा इशारा जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिला. (Shivsena leaders deemand rebel MLA`s resignation)

Shivsena leaders at Jalgaon Meeting
निवडणूक ‘मविप्र’ संस्थेची, चर्चा मात्र राज्यपातळीवर

शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेनेच्या भव्य मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

Shivsena leaders at Jalgaon Meeting
नितीन गडकरी नाशिकला बोलले ते तंतोतंत खरे ठरले!

मोर्चा नेरी नाका चौकात आलेला असताना जिल्ह्यात बंडखोरी करणारे जिल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील व चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.

शिवसेनेने दाखविली ताकद

जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार व एक अपक्ष आमदाराने बंडखोरी केल्यानंतर निघणाऱ्या मोर्चाकडे जिल्हाभरातील नागरिकांचे लक्ष होते. या मोर्चाला शिवसैनिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती. महिला शिवसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मोर्चेकरांच्या हातात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. जिल्ह्यातील चार आमदार गेले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. हेच या मोर्चाने दाखवून दिले.

गद्दारांनो, आमदारकीचा राजीनामा द्या

मोर्चा अजिंठा चौफुलीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी सभा घेण्यात आली. प्रारंभी जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या नावाने बोंबा मारून त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी संजय सावंत म्हणाले, की जिल्ह्यातील आमदारांनीही शिवसेनेशी गद्दारी केली आहे, या आमदारांनी हिमंत असेल तर राजीनामा द्यावा, पुन्हा निवडणुकीला उभे रहावे, जनता मतदानात धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर म्हणाले, की या गद्दार आमदारांना कुणीही काही करायचे नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आदेश दिला आहे. हे आमदार स्वत:च्या कर्तृत्वानेच जाणार आहेत.

नागरिकांमध्ये संताप

महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, आमदारांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्यामुळे जनतेत असंतोष आहे. शिवसैनिकांनी आक्रोश आंदोलनाव्दारे आपला आक्रोश व्यक्त केला आहे. जिल्हाप्रमुख हर्षल माने म्हणाले, आमदारांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना जिल्ह्यात फिरू देवू नका, यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घोषणा दिल्या.

गुलाबराव वाघ यांना धमकी

मोर्चा सुरू असताना शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना भ्रमणध्वनीवरून धमकी आल्याची माहिती जिल्हा संपर्क संजय सावंत यांनी दिली, यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने ही धमकी दिली आहे. आम्ही पोलिसांना आवाहन करतो, की संबंधित स्वीय सहाय्यकावर पोलीसांनी कारवाई करावी

यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका गटनेता नितीन लढ्ढा आदी मोर्चाच्या अग्रभागी होते. गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौकमार्गे हा मोर्चा अजिंठा चौफुली येथे विसर्जित करण्यात आला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com