Shivsena News: शिवसेनेचे विरोधक भविष्यात टिकणार नाही!

संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दोंडाईचा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Babanrao Thorat at Dhule Meeting.
Babanrao Thorat at Dhule Meeting.Sarkarnama

शिंदखेडा : शिवसेना (Shivsena) गेली सहा दशके मराठी (Marathi) बाणा जपत सामान्यांसाठी संघर्ष करीत आली आहे. त्यामुळे राजकीय आव्हाने आम्हाला नवी नाहीत. संघर्षाचा हा वारसाच आमचे बलस्थान असून आगामी काळात शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांचे अस्तित्त्व देखील राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी केले. (Shivsena will aggressivly fight for political Courage)

Babanrao Thorat at Dhule Meeting.
Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

शिवसेनेचे धुळे व नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. दोंडाईचा येथील शासकीय विश्रामगृह येथे शिंदखेडा व शिरपूर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Babanrao Thorat at Dhule Meeting.
`या`मुळे उच्चशिक्षीत सरपंच शीतल नंदन यांना झाली अटक!

बबनराव थोरात म्हणाले, शिवसेनेचा वारसा हा संघर्षाचा असून, शिवसेना पुन्हा ताकदीने उभी राहील. सर्वसामान्य जनता शिवसेनेसोबत आहे, त्यामुळे या परिस्थितीतून लवकर बाहेर पडू, असा विश्वास श्री. थोरात यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्रातील जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असून महाराष्ट्रात गद्दारांना त्यांची जागा जनता नक्कीच दाखवणार, असेही ते म्हणाले.

धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी, जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ. भरतसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, अत्तरसिंग पावरा, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विभा जोगराणा, छोटूसिंग राजपूत, चंद्रसिंग ठाकूर, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, महावीर जैन, शिंदखेडा शहरप्रमुख संतोष देसले, गणेश पाटील, आबा चित्ते, हिरालाल थोरात, राज ढोले आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in