सर्वत्र एकहाती सत्ता हेच शिवसेनेचे ध्येय!

उपनेते बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम झाला.
सर्वत्र एकहाती सत्ता हेच शिवसेनेचे ध्येय!
Baban GholapSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) हा केवळ पक्ष नसून शिवसैनिकांचा मंत्र, ध्यास, आत्मविश्वास आणि श्वास आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी केले. (Shivsena have to will all upcoming elections)

Baban Gholap
खडसे समर्थकांकडून एक दिवस आधीच फटाक्यांचे बुकिंग

शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहर (Nashik) आणि जिल्ह्यात विविध उपक्रम झाले. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात यानिमित्त ५६ किलो लाडूंचे वाटप करण्यात आले.

Baban Gholap
राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे अन् आशुतोष काळे अजून मुंबईबाहेर!

यावेळी शिवसेना कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री. घोलप बोलत होते. उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, माजी गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते. होते.

श्री. घोलप म्हणाले, महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. १९ जून १९६६ ला ही संघटना अस्तित्वात आली. पुढे जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृद्यसम्राट ही उपाधी बहाल केली. सक्रिय राजकारणापासून दूर असूनही अगदी सामान्य माणसापासून बडे राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योजक, कलाकार आदी सर्वांवर बाळासाहेबांचे गारूड होते आणि आजही आहे. बारीक अंगकाठी, पण ओघवती वक्तृत्वशैली, भाषेवरील प्रभुत्त्व आणि जनसामान्यांची नस ओळखणारा नेता म्हणून त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी व्हायची.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दमदार आणि गाजलेल्या भाषणाची आठवण येते. आज या पक्षाची पाळेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहेत. बाळासाहेबांचा समर्थ वारसा त्यांच्ये पुत्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळीत आहेत, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, गेल्या ५६ वर्षांत शिवसेनेने यशाचे मोठे शिखर गाठले आहे. आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून, या सरकारची कामगिरीही दमदार आहे. राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत सर्वत्र एकहाती शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा संकल्प सर्व शिवसैनिकांनी केला, तरच वर्धापनदिन साजरा केल्यासारखे होईल.

यावेळी युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, शिवसेना विधानसभाप्रमुख नीलेश कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, महिला आघाडी संपर्क संघटक संगीता खोडाना, महिला पदाधिकारी मंगला भास्कर, मंदा दातीर, शोभा मगर, शोभा गटकळ नगरसेवक राहुल दिवे, संतोष गायकवाड, प्रवीण तिदमे, चंद्रकांत खाडे, मधुकर जाधव, संगीता जाधव, राधा बेंडकोळी आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in