शिवसेनेने मिळवले नंदुरबारच्या पाणी योजनांसाठी २३.७६ कोटी

नंदुरबार येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना निधी मंजुरीबाबतचा शासन आदेश मिळाला.
शिवसेनेने मिळवले नंदुरबारच्या पाणी योजनांसाठी २३.७६ कोटी
Shivsena Minister Gulabrao PatilSarkarnama

नंदुरबार : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, (Aditya Thakre) पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. विविध योजनांना मंजुरी देत या कामासाठी २३ कोटी ७६ लाखांच्या निधीला मंजुरी दिली. तसे शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आले आहेत.

Shivsena Minister Gulabrao Patil
नितीन राऊत पक्षाच्या बैठकीत न जाताच परतले; लोंढे म्हणतात, ते नाराज नाहीत…

या संदर्भात जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेतृत्वाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यातील देवस्थानांसह मोठी गावे म्हणून शनिमांडळ, प्रकाशा आणि रनाळेची ओळख आहे. परिसरात पडणाऱ्या कमी पर्जन्यमानामुळे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती.

Shivsena Minister Gulabrao Patil
धक्कादायक...आदित्य ठाकरेंच्या कारवाईनंतर हरकतींचा पाऊस

शनिमांडळ गावात असणाऱ्या ब्रिटिशकालीन तलावातून पाण्याचा कायम स्रोत असल्याने त्यातून नळाद्वारे पाणीपुरवठा केल्यास शनिमांडळ गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार होता. शनिमांडळप्रमाणेच रनाळे गावातसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी अशीच काहीशी बिकट परिस्थिती होती. या ठिकाणीदेखील गावाच्या पाण्याच्या स्रोतातून नळ योजना सुरू केल्यास गावात पाण्याची समस्या मिटणार होती.

याच अनुषंगाने जिल्हाप्रमुख डॉ. विकांत मोरे, आमश्या पाडवी, शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते, जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके, जिल्‍हा परिषद सदस्या शंकुतला शिंत्रे, रनाळे गावचे सरपंच तृष्णा गवते, सुरेश शिंत्रे, शनिमांडळचे सरपंच योगेश मोरे, सयाजीराव मोरे, मुन्ना पाटील, भाऊसाहेब पाटील या स्थानिक नेत्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेत त्यांच्यासोबत जलजीवन मिशनअंतर्गत या गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने मागच्या आठवड्यात बैठक घेत निवेदन दिले होते.

याची दखल घेत या दोन्ही नेत्यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे आणि शनिमांडळ या गावांना जलजीवन मिशनअंतर्गत मंजुरी देत त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यतादेखील दिली आहे. शनिमांडळ गावासाठी सहा कोटी ८१ लाख ७६, रनाळे गावासाठी ११ कोटी २९ लाख दोन हजार रुपये, प्रकाशा पाणीपुरवठा योजनेला पाच कोटी ६५ लाख २६ हजारांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in