Shivsena: बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा धक्का!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात नियुक्त केले नवे पदाधिकारी
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

जळगाव: शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात संघटनात्मक फेररचनेवर भर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडात सामील झालेले मुक्ताईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. या मतदारसंघात नवी नेमणूक केल्याने आमदार पाटील यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. (Rebel MLA Chandrakant patil was countered by Shivsena)

Chandrakant Patil
MNS: आता अमित ठाकरे निघणार महासंपर्क अभियान दौऱ्यावर

शिवसेनेच्या आमदारांनी बंड करून पक्षालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या सर्वच आमदाव व मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून शिवसेना पक्षप्रमुखांनाच आव्हान देण्याचे कामसुरु ठेवेल होते. यासंदर्भात श्री. पाटील यांनी सातत्याने शिवसेनेच्या प्रामाणीक कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

Chandrakant Patil
राज्य शासनाला न्यायालयाचा धक्का; धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई

या पार्श्वभूमीवर बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडून काढून घेत, त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांचाही समावेश आहे. बंडखोर आमदारांसोबत जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात जिल्ह्यात आलेले संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पक्षात मोठे फेरबदल केले जात असून, नव्याने पदाधिकारी नियुक्त केल जात आहे. आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची धुरा आता माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याकडे देण्यात आली आहे.

राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. जिल्ह्यात झालेल्या या फेरबदलामुळे आ. चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का मानला जात असून जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या गटात खळबळ उडाली आहे. येत्या काळात अनेकांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in