शिवसेनेने भाजपला दिला वर्क ऑर्डरचा राजकीय डोस!

लोहारा आरोग्य केंद्र इमारतीस अखेर मंजुरी मिळाली.
शिवसेनेने भाजपला दिला वर्क ऑर्डरचा राजकीय डोस!

Gulabrao Patil

Sarkarnama

पाचोरा : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा पाया मानला जातो. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आपला प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणताही विषय असो, त्याला राजकीय स्पर्श झाल्याशिवाय राहात नाही. या माध्यमातून राजकीय कुरघोड्या वाढत असल्याने तालुक्यावरील राजकीय ढगांचा गडगडाट वाढला आहे.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil</p></div>
ओबीसी समाजास हक्कापासून वंचित ठेवून चालणार नाही

लोहारा (ता. पाचोरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकाम प्रकरण शिवसेनेने मंत्रालयापर्यंत नेऊन मंत्रिमहोदयांकडून बांधकामाची वर्कऑर्डर मिळवून भाजपला चांगलाच डोस दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले आहे.

लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामास गेल्या वर्षीच परवानगी मिळाली. निधीही मंजूर झाला. परंतु बांधकामाची वर्कऑर्डर देण्यास मात्र जिल्हा परिषदेकडून विलंब झाला. सरपंच अक्षय जैस्वाल यांनी अनेकदा वर्कऑर्डरसंदर्भात मागणी केली. हे प्रकरण खंडपीठापर्यंतही गेले. न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाली तरी बांधकामाची वर्कऑर्डर देण्यास विलंब करण्यात येत असल्याने सरपंच जैस्वाल यांनी जिल्हा परिषदेसमोर १ डिसेंबरपासून उपोषण आंदोलन सुरू केले. या आंदोलनास ग्रामस्थांचे चांगलेच सहकार्य लाभले. उपोषण सहा दिवस सुरू होते. तरीदेखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत योग्य तो दिलासा देत इमारत बांधकामासंदर्भात आश्वासित केले नाही.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil</p></div>
`एसटी`चे व्यावस्थापन खाजगी तज्ञांच्या हातात देणे आवश्यक!

शेवटी हे प्रकरण पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांच्याकडे नेण्यात आले. दीपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकामासंदर्भात जाणीवपूर्वक कशा पद्धतीने विलंब केला जात आहे, याचा लेखाजोखा मांडला. मंत्री मुश्रीफ यांनी मागील संपूर्ण परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारात इमारत बांधकाम वर्कऑर्डर देण्याचे आदेशित केले.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना इमारत बांधकाम कार्यारंभ करण्याबाबत आदेश दिले. लोहारा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. पाचोरा पंचायत समिती शिवसेनेकडे आहे, तर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. विशेष म्हणजे, लोहारा हे गाव पाचोरा तालुक्यात असले तरी जामनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहे. तेथेही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हे प्रकरण राजकीय चक्रव्यूहात अडकले व श्रेयवादामुळे इमारत बांधकाम वर्कऑर्डरसाठी विलंब करण्यात आला. शेवटी शिवसेनेचे पालकमंत्री व आमदारांनी मंत्र्यांच्या माध्यमातून इमारत बांधकाम कार्यारंभ करण्याचे आदेश प्राप्त करून भाजपला चांगलाच डोस दिला आहे.

इमारत बांधकाम कर्यारंभाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सरपंच अक्षय जैस्वाल, दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, उद्धव मराठे आदींच्या उपस्थितीत इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे सरपंच जैस्वाल यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने भाजपला आरोग्य केंद्राचा दिलेल्या या डोसची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.