शिवसेनेने कांदेंचे आव्हान स्विकारले; निधीची यादी जाहीर करत राजीनाम्याची मागणी

शिवसेनेच्या ट्वीटर ग्रुपवर आदित्य ठाकरे यांच्या विभागाकडून मंजूर झालेल्या निधीचा तपशील जाहीर केला आहे.
Aditya Thakre & Suhas Kande
Aditya Thakre & Suhas KandeSarkarnama

नाशिक : बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी माझ्या मतदारसंघात एक रुपयाही निधी दिला नाही. निधी दिल्याचे दाखविल्यास लगेच राजीनामा देईन असे म्हटले होते. ते आव्हान स्विकारत शिवसेनेने (Shivsena) आठ कोटींची सहा कामे मंजूर केल्याचे पुरावे सादर केले आहे. त्यामुळे आता सुहास कांदे शब्द पाळून राजीनामा देतील का? अशी विचारणा शिवसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. (Now will MLA suhas kande give resignation)

Aditya Thakre & Suhas Kande
हेमंत गोडसे नाशिकला; शिवसैनिक मात्र गेले `मातोश्री`वर

यासंदर्भात ट्वीटमध्ये म्हटले आहे की, `आमदार सुहास कांदे म्हणाले आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघासाठी एकही रुपया निधी दिला नाही, दिला असेल तर दाखवावा मी राजीनामा देईन...हा पहा निधीचा तपशील. आता आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे`

Aditya Thakre & Suhas Kande
शिंदेंची सुरक्षा : सुहास कांदेंच्या आरोपांना देसाई, केसरकर, भुसेंकडून दुजोरा

या संदर्भात शिवसेना कम्युनिकेशन ट्वीटर ग्रुपवर किती निधी दिला आहे, त्याचा तपशील आहे. यामध्ये मनमाड येथी श्री गुरुद्वारा हे पर्यटन स्थळ सुशोभिकरण करणे (५० लाख), वै. ह. भ. प. मास्तरबाबा देवस्थान खायदे (ता. मालेगाव) परिसर सुशोभिकरण (५० लाख), श्री. विरोबा महाराज देवस्थान साकुरी (नि) ता. मालेगाव येथे भक्तस निवास बांधकाम (५० लाख), प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मालेगाव हद्दीतील सर्व्हे क्रमांक ५६/१ मोकळ्या जागेत महिलांसाठी उद्यान व जिमखाना (१.२५ कोटी), मंदीर परिसरात रस्ता व पेव्हर ब्लॅाक बसविणे (५० लाख), पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथे पायाभूत सुविधा उभारणे (४.७५ कोटी) असा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी २.१५ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

बंडखोर आमदार कांदे यांनी काल आदित्य ठाकरे यांची शिवसंपर्क यात्रा मनमाड येथे आली असता, ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रय्तन केला होता. त्यासाठी त्यांनी मतदारसंघासाठी काहीच निधी दिला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याने झेड प्लस सुरक्षा देण्यास मातोश्रीतून विरोध झाल्याचा आरोप करीत वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते माध्यमांच्या केंद्रस्थानी आले होते. आता शिवसेनेने `हा सूर्य हा जयद्रथ` अशी स्थिती केल्याने आमदार कांदे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in