
नाशिक : दिंडोरी (Nashik) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले, (Dhanraj Mahale) सुरेश डोखळे (Suresh Dokhale) यांच्यासह पदाधिका-यांनी मंगळवारी नागपूर (Nagpur) येथे शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने जिल्हयातील ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या शिवसेनेला (Shivsena) धक्का दिला आहे. त्याचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाला लाभ होऊ शकतो. (Eknath Shinde group success to expand in Nashik rural)
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील १३ माजी नगरसेवकांना गळाला लावत शहरातील उद्धव ठाकरे शिवसेनेला सुरूंग लावल्यानंतर शिंदे गटाने आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदारांनी शिवसेनेतून केलेले बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक शहर व जिल्हयात स्थानिक पातळीवरील फारशी पडझड झाली नाही.
पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांनी प्रवेश केलेला असला तरी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटापासून अलिप्त होते. शहरातून माजी नगरसेवक प्रवीण तिदमे तर माजी आमदार काशीनाश मेंगाळ, अनिल ढिकले, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतू, शहरातील निष्ठावान शिवसैनिकांचा पाया हलला नाही. मात्र, महापालिकेतील १३ माजी नगरसेविकांसह अजय बोरस्ते यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. हा धक्का पचवत असतानाच उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांचे खंदे मानले जाणारे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ग्रामीणचे सुनील पाटील यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिंदे गटात जाण्य़ाचे शहरातील लोण आता जिल्हयाच्या ग्रामीण भागात पोहचले आहे.
उद्धव ठाकरे यांचा ग्रामीणचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी तालुक्यावर शिंदे गटाने लक्ष केंद्रीत करीत येथील माजी आमदार महाले यांना गळाला लावले आहे. धनराज महाले यांसह ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, कादवा साखर कारखान्यांचे माजी संचालक संतपराव घडवजे, बाळासाहेब मेंदणे, युवा नेते सचिन बर्डे, किरण कड यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंगळवारी रात्री उशिरा नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे शिंदे गटाने स्वागत केले. या प्रवेशाने जिल्हयाच्या सहकार क्षेत्रातही शिंदे गटाने प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मंगळवारी माजी आमदार धनराज महाले आणि दिंडोरी तालुक्यातील 50 पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला. मात्र हे पन्नास पदाधिकारी कोण हे समजु शकले नाही. मंगेश करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश भडांगे, मनसेच्या माजी नगरसेविका मेघा नितीन साळवे, सिडकोतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबूराव आढाव आणि छत्रपती सेना युवासेना अध्यक्ष गणेश कदम, विक्रम कदम या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याचा दाव करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.