शिवसेनेच्या अनिल कदम यांचा आमदार दिलीप बनकरांना संदेश... `टायगर अभी जिंदा है`

मिसळपार्टीतून शिवसेनेचे माजी आमदार कदम यांच्या भावी राजकारणाची चाचपणी.
Ex MLA Anil Kadam with supporters
Ex MLA Anil Kadam with supporters Sarkarnama

पिंपळगाव बसवंत : शिवसेनेचे आक्रमक नेते, माजी आमदार अनिल कदम (Ex MLA Anil Kadam) यांनी दिवाळीचे औचित्य साधून तालुक्यातील नेते, समर्थकांची मिसळपार्टीच्या निमित्ताने स्नेहभेट घेतली. ते राजकीय व्यासपीठ नसले तरी आगामी राजकीय हालचालींतून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना सक्रीय संदेश दिला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर (NCP MLA Deelip Bankar) यांच्यासाठी `टायगर अभी जिंदा है` हा संदेश असल्याने कदम यांचे समर्थक चार्ज झाले.

Ex MLA Anil Kadam with supporters
रझा ॲकॅडमीने दिली शुक्रवारी मुंबईसह नाशिक बंदची हाक

निफाडच्या राजकीय पटलावर अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यापासून नेते प्रयत्नशील असतात. कोणत्या ना कोणत्या उपक्रमातून चर्चेत राहणे हा राजकीय रणनीतीचा भाग असतो. दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी गेले काही दिवस वेट अँड वॅाच या भूमिकेत राहणे पसंत केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा सक्रीय झाले आहे. राजकीय रणांगणात उतरण्यासाठी सज्ज झाले. विशेषतः राज्यातील आघाडीच्या पिंपळगाव बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची मिसळ पार्टीद्वारे खमंग चर्चा व झणझणीत व्यूहरचना सुरु केल्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी शर्यत अजून संपलेली नसल्याचा संदेश दिला.

Ex MLA Anil Kadam with supporters
अमरीशभाईंनी चार वेळा बँक बिनविरोध केली, यंदाच का होतेय निवडणूक?

अगदी मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार कदम यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बनकर यांनी पराभव केला. त्यावेळी आमदार बनकर यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्‍नचिन्ह उभे होते, तेच प्रश्‍नचिन्ह आता कदम यांच्या नावाभोवती फिरते आहे. गेली दोन वर्ष कदम यांनी राजकीय विश्रांती घेत घडामोडींवर लक्ष ठेऊन निरीक्षणावर भर दिला होता. सध्या ते पुन्हा निफाडच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी व संपर्क सुरु केला आहे.

कोणतीही सत्ता पद नसताना श्री. कदम यांनी त्यांच्या गटाचे नेते, कार्यकर्त्यांची मोट अबाधित राखली आहे. या शिवाय दुरावलेल्यांशी जवळीक निर्माण केली आहे. ओझरला कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या मिसळपार्टीला दिसलेल्या उपस्थितीवरून तसे अधोरेखित होत होते. पिंपळगाव बाजार समिती व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुकांची गर्दीही दिसली.

तो निर्णय चुकीचा...

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्वच जण दुरावले होते. दिवाळीच्या निमित्ताने ही स्नेहभेट व्हावी म्हणून मिसळपार्टीचे आयोजन केले. भेटी लागे जिवा...असा निखळ उद्देश यात असल्याचे कदम यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधताना केले. आगामी बाजार समिती निवडणुकीत पुन्हा बिनविरोधचा चमत्कार दिसेल का या प्रश्‍नावर कदम यांनी येती निवडणूक सर्वशक्तीनिशी लढणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्यावेळच्या बिनविरोध निवडणुकीची तडजोडीचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली त्यांनी दिली.

जनतेचे प्रेम कायम

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या उत्सवात शिवसेनेची ताकद निफाड तालुक्यात कायम असल्याचे दाखविणार असल्याचा आत्मविश्‍वास कदम यांच्या बोलण्यातून दिसला. जिल्हा परिषदेसाठी कसबे सुकेणे गटासाठी घरातून उमेदवार देणार काय, या प्रश्‍नाला त्यांनी नकार दिला नाही. राजकीय आयुष्यात चढ-उतार येत असतात. कोणतेही सत्ता केद्र नसतांना जनतेचे प्रेम कायम आहे, त्यांच्यासाठी व जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकीय प्रवाहात कायम राहणार असल्याचे माजी आमदार कदम यांनी स्पष्ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com