आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

शिवसेनेने बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्या नियुक्त्या केल्या आहेत.
Suhas Kande News, Nashik News, Ganesh Dhatrak News, Shivsena News
Suhas Kande News, Nashik News, Ganesh Dhatrak News, Shivsena NewsSarkarnama

नाशिक : शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर नव्याने संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघनिहाय संपर्क प्रमुख जाहीर केले. बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे जिल्हाप्रमुख काढण्यात आले. गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) नवे जिल्हाप्रमुख झाले आहेत. (Shivsena supremo Uddhav Thakre declaires new Office bearers)

Suhas Kande News, Nashik News, Ganesh Dhatrak News, Shivsena News
दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावर जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी जयंत दिंडे यांना संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अल्ताफ खान (सह संपर्कप्रमुख), सुनील पाटील, (दिंडोरी कळवण बागलाण जिल्हाप्रमुख), गणेश धात्रक (नांदगाव, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य), कुणाल दराडे यांच्याकडे निफाड, येवला व चांदवड तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.(Nashik Latest Marathi News)

Suhas Kande News, Nashik News, Ganesh Dhatrak News, Shivsena News
खासदार शेवाळे यांनी त्या महिलेला 56 लाख रुपये अन् आय फोनही दिला

आमदार सुहास कांदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नांदगाव मतदारसंघात राजकीय अनिश्चितता होती. मात्र आमदारांनी बंडखोरी केली तरी श्री. धात्रक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी शक्तप्रदर्शन करीत शिवसेनेतच राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे धात्रक यांच्या नियुक्तीने शिवसेनेची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे. श्री. धात्रक नांदगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार होऊ शकता. आगामी काळात कांदे विरूद्ध धात्रक असा सामना पहायला मिळू शकतो. (Suhas Kande News in Marathi)

कुणाल दराडे सर्वात तरूण जिल्हाप्रमुख!

युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र विस्तारक कुणाल दराडे यांची निफाड, येवला व चांदवड या तीन विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मातोश्रीहून या नियुक्तीची घोषणा आज करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात तरुण जिल्हाप्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव व शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे पुतणे असलेल्या कुणाल दराडे यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. गेल्या पाच वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून आई सुरेखा दराडे यांना राजापूर जिल्हा परिषद गटातून विजयी करण्यासह त्यांच्या शिक्षण व आरोग्य सभापती पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली आहे.

मागील आठवड्यातच स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार दराडे व कुणाल दराडे यांची भेट झाली होती. यावेळी पक्ष संघटनेबाबत चर्चा झाली होती. येवला लासलगाव, निफाड व चांदवड या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नव्या बांधणीसाठी नेटाने काम करून पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत राहू असा विश्वास कृणाल दराडे यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in