शिवसेनेच्या नगरसेवकांची आज उद्धव ठाकरे घेणार एकनिष्ठतेची शिकवणी!

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन लिहून देणार एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र
Uddhav Thakrey
Uddhav ThakreySarkarnama

नाशिक : ज्यांना कट्टर शिवसैनिक (Shivsena) म्हटले जायचे, त्याच निष्ठावंतांनी स्वतंत्र गट (Rebel) स्थापन करत शिवसेनेच्या बुरुजांना सुरुंग लावले. त्यामुळे नाशिकच्या (Nashik) किल्ल्याच्या डागडुजीसाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) स्वतः मैदानात उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकचे ३४ माजी नगरसेवकांची एकनिष्ठतेची शिकवणी ते स्वतः आज मुंबईत घेणार आहेत. (Shivsena party chief will take tution of ex-corporators for loyality)

Uddhav Thakrey
धक्कादायक...मला ‘ड्रग माफिया’ घोषित करून तुरुंगात टाकणार होते!

यासंदर्भात शिवबंधन बांधण्याची परंपरा मोडीत काढत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असल्याने ही बाब शिवसैनिकांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते.

Uddhav Thakrey
आदित्य ठाकरे गर्जले : प्रेम व विश्वासाचे अपचन झाल्याने त्यांना आमच्यावर राग

राज्यसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली. एक- दोन नव्हे तब्बल ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यास भाग पडले. त्याचबरोबर लोकसभेतदेखील स्वतंत्र गट स्थापन केल्याने शिवसेनेची पडझड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगली जिव्हारी लागली. त्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे करत शिवसैनिकांचे मत आजमावून घेताना पक्ष संघटना बळकटीकडे लक्ष देत आहे.

मुंबईसह राज्यातील विविध भागातून शिवसेनेचे पदाधिकारी तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. तर, अनेक ठिकाणी पक्षप्रमुखांकडूनच बोलावणे येत असून एकनिष्ठतेचा शब्द सोडून घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या माजी नगरसेवकांना रविवारी (ता. २४) मातोश्रीवर बोलविण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकप्रतिनिधींशी संवाद साधतील. या वेळी एकनिष्ठतेची प्रमाणपत्र लिहून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरसेवकांबरोबरच महत्त्वाचे पदाधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

९०० प्रतिज्ञापत्र अपेक्षित

नाशिक शहरात साडेतीन विधानसभा मतदारसंघ असून, यातून ९०० प्रतिज्ञापत्र अपेक्षित आहे आतापर्यंत जवळपास ३०० प्रतिज्ञापत्र भरून देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. माजी नगरसेवकांबरोबरच बूथप्रमुखापर्यंत प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

थेट मातोश्रीवर पाचारण

शिवसैनिकांसाठी मातोश्री पंढरी मानली जाते. परंतु, गेल्या काही वर्षात मातोश्रीऐवजी शिवसेना भवनामध्ये बैठकांचा जोर राहिला. ज्या आमदारांनी स्वतंत्र सवतासुभा उभारला त्यांच्याकडून आरोप होत असताना मातोश्रीची दारे बंद झाल्याचादेखील दावा केला गेला. त्यामुळे स्वतंत्र बैठका शिवसेना भवनऐवजी मातोश्रीवर घेण्यात येत असल्याचे समजते.

...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ३३ माजी नगरसेवक व कोअर कमिटीचे सदस्य मातोश्रीवर जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन होईल.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in