Shivsena: नाशिकच्या अपघातग्रस्तांना मदतीत मुख्यमंत्र्यांचा भेदभाव!

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला.
Shivsena leaders at Hospital
Shivsena leaders at HospitalSarkarnama

नाशिक : मुंबई (Mumbai) व ठाण्यामधील (Thane) दहीहंडीच्या गोविंदा पथकातील गोविंदा मृत्युमुखी पडल्यास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत (10 lacs relief) व वारसांना सरकारी नोकरीत (Government job) सामावून घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मात्र नाशिक (Nashik) मध्ये बस दुर्घटनेतील मृतांना जाहीर केलेल्या आर्थिक मदतीवरून मुंबई (Mumbai) व महाराष्ट्रात (Maharashtra) भेदभाव करीत असल्याचे स्पष्ट होते असा आरोप शिवसेनेचे (Shivsena) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केला. (Nashik Shivsena leaders deemands relief for accident in Nashik like Mumbai)

Shivsena leaders at Hospital
Shivsena: `आता याचा बदला लोकच घेतील`

मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचे आत्मपरीक्षण करावे. अपघाताला महापालिका आयुक्त जबाबदार आहे की आरटीओचे अधिकारी याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Shivsena leaders at Hospital
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

जिथे अपघात घडला तेथे महामार्ग ६० मीटरचा असताना फॅनिंग ३० मीटरचे असणे आवश्यक आहे मात्र येथे फॅनिंग नाही म्हणून येथे अपघात घडला आहे. ३० मीटरचे फॅनिंग असते तर फ्री वे दिसून आला असता. अपघाताचे स्थळ आहे, तिथे महापालिका आयुक्तांनी फॅनिंग केले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार महामार्गावरील चौफुलींवर फॅनिंग असणे गरजेचे आहे. नाशिक मधून जाणाऱ्या महामार्गांवर तसे फॅनिंग दिसत नाही त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल व ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड उपस्थित होते.

अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयास भेट दिली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मृतांचे नातेवाईक आणि जखमींना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांनी दिले.

उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शोभा मगर आदींनी घटनास्थळी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस करीत त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यास शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले. ही दुर्घटना अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे उपनेते सुनील बागूल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com