निवडणुकीनंतर शिवसेनेचा जल्लोष तर `राष्ट्रवादी`चे मात्र भिख मांगो आंदोलन!

बोदवडला पद स्वीकारताच शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला.
Shivsena celebration at Bodwad
Shivsena celebration at BodwadSarkarnama

बोदवड : शहरातील नगरपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) व शिवसेनेकडून (Shivsena) सूचित केलेल्या दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा झाली. नियुक्तीचा हा ठराव बहुमताने मंजूर झाला. शिवसेनेकडून व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष माजी शहरप्रमुख राजेश नानवानी व राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक ॲड. दीपक झांबड या दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. (Sivsena & NCP corporators elected in Bodwad corporation)

Shivsena celebration at Bodwad
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना शिवसेनेकडून धोबीपछाड!

या निवडीदरम्यान ढोल- ताशांच्या गजरात नगरपंचायत कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आतषबाजी करून सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक नानवानी यांची मिरवणूक काढण्यात आली. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने निवड झाल्यावर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी भिख मांगो आंदोलन केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने निवड होताच शहर विकासाच्या आणि नागरिकांच्या समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेनेला टिकेचा विषय केले. त्यांची ही भूमिका व आंदोलन दोन्ही चर्चेता विषय झाले.

Shivsena celebration at Bodwad
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे देश सशक्त बनला!

या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक भरत पाटील, मुजमिल शहा हकीम बागवान, लतीफ शेख, मनोज ठोसरे यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

नगरपंचायत कार्यालयात स्वीकृत नगरसेवक नियुक्ती पार पडल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक नानवानी यांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले. यावेळी मात्र शिवसेनेचे नगरसेवक अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना अर्धा तास ताटकळत थांबावे लागले. हे समजल्यावर सर्व नगरसेवक धावपळ करीत चौकात आले. त्यांनी आमदार पाटील यांची मनधरणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत स्वीकृत नगरसेवकाचा सत्कार केला. आमदार चंद्रकांत पाटील यांना डीपीडीसी बैठकीनंतर सायंकाळी साडेचारला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जायचे होते. तरीही कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून धावती भेट दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com