शिवसेनेचे चार खासदार देखील निवडूण येणार नाही!

आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या मुंबईतील सभेनंतर टिका केली.
शिवसेनेचे चार खासदार देखील निवडूण येणार नाही!
Uddhav Thakre & Girish MahajanSarkarnama

धुळे : शिवसेना (Shivsena) सत्तालंपट आहे. त्यांची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. शिवसेनेचे हिंदूत्व (Hindutva) बेगडी असून ते फक्त डराव...डराव करून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र त्याने जनतेची दिशाभूल होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणून दाखवावे, असे आव्हान भाजप नेते, (BJP) माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली. (BJP criticise Shivsena`s hindutwa artificial)

Uddhav Thakre & Girish Mahajan
शरद पवारांवर निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज मुंबईतील सभेनंतर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी टिकेची तोफ डागली.

धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त आमदार महाजन येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा पंतप्रधान बनवून देशातील जनतेने त्यांना लोकनेता म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. अशा वेळी शिवसेनेच्या दाखल्याची भाजपसह पंतप्रधान मोदी यांना गरज नाही.

Uddhav Thakre & Girish Mahajan
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

ते म्हणाले, देशात सर्वाधिक बहुमताने मोदींच्या नेतृत्वात भाजपची ऐतिहासिक सत्ता आली आहे. शिवसेनेची कुवत काय हे आधी ओळखावे. या पक्षाची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. यापेक्षा समुद्रात काय चाललंय ते त्यांनी पाहावे. देशाची जनता मोदींकडे नेतृत्व म्हणून पाहते. त्यावर शिवसेना काय डराव...डराव करते.

ते म्हणाले, रशिया व युक्रेनच्या युध्दामुळे जगात महागाई झाली आहे. श्रीलंकेत साडेतीनशे ते चारशे लिटर डिझेल-पेट्रोल झाले आहे. गॅसच्या किमती वाढत आहेत. राज्यातील रस्ते विकास, मेट्रो, समृद्धी महामार्गात शिवसेना, महाविकास आघाडी सरकारचे काय कर्तृत्व आहे. हे विकास प्रकल्प मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत झाले आहेत. त्यांच्या जीवावर तुम्ही (विरोधक) कॉलर टाईट करत आहात. देशात केवळ भाजपशी युती असल्याने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणावे, असे आव्हान आमदार महाजन यांनी दिले.

हिंदूत्वाविषयी छडले असता आमदार महाजन यांनी नमूद केले, की हिंदूत्वाची भूमिका पटवून देताना मुख्यमंत्री ठाकरे यांची दमछाक होते आहे. ते या मुद्द्यावर आगामी निवडणुकीत यशस्वी होणार नाहीत. मुंबईतील सभा म्हणजे शिळ्या कढीला उत, असा प्रकार असून केवळ शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे आणि आम्ही हिंदूत्ववादी कसे असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत. भोंगे, हनुमान चालीसा यावर शिवसेना बोलायला तयार नाही. त्यांचे हिंदूत्व बेगडी आहे. सत्तालंपट झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीशी जवळीक ठेऊन खुर्ची टिकविण्याची शिवसेनेची धडपड आहे. पूर्वीची आणि आताच्या शिवसेनेत अंतर पडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळणी करून शिवसेना सत्तेत आली. युती नसती तर शिवसेनेचे २५ आमदार निवडून आले नसते, अशी टिकाही आमदार महाजन यांनी केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.